For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur | कोल्हापूरचा 'अर्थ अवर' यशस्वी! एका तासात ३ हजार युनिट विजेची केली मोठी बचत

01:38 PM Mar 29, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur   कोल्हापूरचा  अर्थ अवर  यशस्वी  एका तासात ३ हजार युनिट विजेची केली मोठी बचत
Advertisement

          कोल्हापुरात ‘अर्थ अवर’ उत्साहात, हजारो युनिट वीज बचत

Advertisement

कोल्हापूर -वर्ल्ड वाईल्ड फंडकडून करण्यात आलेल्या आवाहनानुसार शनिवारी कोल्हापुरात 'अर्थ अवर' पाळण्यात आला. नागरिकांना वीजेच्या बचतीचे महत्व कळावे, हवेत मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या कार्बनच्या उत्सर्जनाला प्रतिबंध व्हावा असा 'अर्थ अवर' पाळण्याचे आवाहन करण्यामागे उद्देश होता. या उद्देशाला सफल करण्यासाठी कोल्हापूर शहरातील सर्व पथदिवे शनिवारी रात्री एक तास बंद करून विजेची बचत करण्याचा संकल्प सोडला. दिवे बंद ठेवण्यातून महापालिकेची ३ हजार युनिट इतकी वीज बचत झाली.

अनेक नागरिकांनी स्वयंस्फुर्तनि अनावश्यक ऊर्जेची उपकरणे बंद ठेवून वीज बचतीचा निर्धार केला. कोल्हापूर महानगरपालिका व डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अर्थ अवर पाळण्याचे कोल्हापूरवासियांनी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सायंकाळी साडे सात ते रात्री साडे आठ या कालावधीत अर्थ अवर पाळला गेला. नर्सरीबागेजवळील छत्रपती शाहू समाधी स्थळाजवळ मान्यवरांच्या उपस्थितीत काल हा उपक्रम पार पडला. यावेळी इंजिनिअरिंगच्या शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी १००० हजारपणत्या प्रज्वलित करत वीजेची बचत करण्याचा निर्धार पक्क केला. तसेच महापालिकेच्या विद्युत विभागाने एक तास कोल्हापूर शहरातील सर्व पथदिवे बंद केले. त्यामुळे एका तासामागे हवेत निर्माण होणाऱ्या तब्बल १३२० किलो कार्बनला प्रतिबंध बसला.

Advertisement

दरम्यान, वीजेच्या बचतीचा संकल्प करण्याचे ध्येय आणि त्यासाठी माणसामाणसात पेरला जाणारा संदेश 'अर्थ अवर' या उपक्रमातून २००७सालापासून जगभर केला जात आहे. तब्बल १९० देशांत हा उपक्रम एक चळवळ म्हणून राबवला जातो. डी. वाय. इंजिनिअरिंग महाविद्यालयाकडूनही गेल्या १७ वर्षापासून 'अर्थ अवर'चा उपक्रम केला जात आहे. शनिवारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी १ हजार पणत्या प्रज्वलित करून ६० हा लोगो तयार करत छत्रपती शाहू समाधीस्थळ उजळून सोडले. विद्यार्थ्यांनी उपस्थित नागरिकांना 'अर्थ अवर'चे महत्त्वही पटवून सांगितले.

यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, एनएसएस समन्वयक प्रा. योगेश चौगुले, डॉ. राहुल पाटील, प्रा. मंजित जाधव, एनएसएसचे विध्यार्थी अजिंक्य म्हगोरे, पद्मानीश पाटील, यश मोरे, ओंकार पाटील, ऋतुराज भद्रापुरे व सेजल खोत उपस्थित होते.

अर्थ अवरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व कोल्हापूर महापालिकेचे शहर अभियंता रमेश मस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisement
Tags :

.