कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापूरची हवा बनली धोकादायक

01:54 PM Dec 16, 2024 IST | Pooja Marathe
Kolhapur's air has become dangerous
Advertisement

कोल्हापूर
शहराचा हवाचा गुणवत्ता निर्देशांक 50 च्या खाली असणे आवश्यक असताना सध्या हा निर्देशांक 110 च्यावर गेला आहे. यामुळे शहराची हवा धोकादायक बनली आहे. खराब झालेले रस्ते, वारंवार पेटविण्यात येणारा कचरा, बांधकामावेळी होणारी धूळ, बांधकामावेळी होणारी वृक्षतोड यास कारणीभूत आहे. अशीच स्थिती राहिली तर कोल्हापूरची आवस्था दिल्ली सारखी होण्यास अवधी लागणार नाही.
यूएस एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सीने वायू प्रदूषणाची पातळी आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला होणाऱ्या धोक्यांची माहिती देण्यासाठी एअर क्वालिटी इंडेक्स (हवेचा गुणवत्ता निर्देशांक) नावाचे एक साधन तयार केले आहे. हवेची गुणवत्ता खूप लवकर बदलू शकते आणि एअर क्वालिटी इंडेक्स लोकांना हवामानाच्या अंदाजाप्रमाणेच त्यांच्या क्षेत्रातील सध्याच्या हवेच्या स्थितीवर राहू देते.
हवेमध्ये एक किंवा अनेक प्रदूषक असतात जे आपल्या फुफ्फुसांना आणि एकूणच आरोग्यासाठी घातक असतात. वेगवेगळ्या स्वरूपातील प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खराब होते. खराब हवेची गुणवत्ता ही प्रदूषित हवा आहे आणि वायू प्रदूषणात योगदान देणारे अनेक स्त्रोत आहेत.

Advertisement

101 वर हवेची गुणवत्ता निर्देशाक असल्यास होणारा परिणाम
101 वर हवेची गुणवत्ता निर्देशांक असल्यास दमा, सीओपीडी आणि फुफ्फुसाच्या कर्करोगासह हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी किंवा फुफ्फुसाचे आजार असलेल्यांना घातक ठरते. कोल्हापुरात 110 हवेची गुणवत्ता निर्देशांक असल्याने संबंधितांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

Advertisement

एअर क्वालिटी इंडेक्स काय आहे?
1970 मध्ये क्लीन एअर ऍक्टची स्थापना केली. हा कायद्यांचा एक संच आहे जो युनायटेड स्टेट्समधील हवेमध्ये परवानगी असलेल्या प्रदूषकांचे प्रमाण मर्यादित आणि नियंत्रित करतो. त्यानंतर लगेचच एअर क्वालिटी इंडेक्स तयार करण्यात आला. हे लोकांना ते जिथे राहतात आणि काम करतात त्या आसपासच्या हवेच्या गुणवत्तेबद्दल सूचित करते.

हवा प्रदूषित होण्याची कारणे
वाहतूक, इंधनाचे दहन, कोळसा, लाकुड, वाळलेले गवत यांसारख्या जीवाश्न इंधनाचे जळण, आणि बांधकाम कार्य याद्वारे होते. मोटार वाहने कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन्स व नायट्रोजन ऑक्साईडची उच्च पातळी निर्माण करतात त्यामुळे हवेचे होते. कोल्हापूर शहराजवळ असणारे कारखाने त्यामधून होणारे प्रदूषण, शेतीमधील कचरा पेटवल्यामुळे, वहानातील धूरामुळे तसेच रस्त्यामधील धुळ

हवा प्रदूषणावर उपाय
शहरात सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनाबरोबर इतर वाहनांना सीएनजीचा वापर करणे गरजेचे आहे. अपारंपारिक ऊर्जेच्या वाहनांचा वापर वाढवणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील अतिक्रमणे दूर करणे, जैवइंधनाचा वापर करणे, पार्किंग व वाहतूक सुविधा सुलभ करणे, सार्वजनिक वाहने सक्षम करणे, झाडे लावणे. कोल्हापुरात हवा प्रदूषणात वाढ होत आहे. खराब झालेले रस्ते, बांधकामावेळी तसेच नदी-तलावालगत झालेली वृक्षतोड यास कारणीभूत आहे. यावर उपाय योजना केल्यावरच शहराचा हवेतील प्रदूषण नियंत्रणात येऊ शकले.
-डॉ युवराज मोटे, भूगोल व पर्यावरण अभ्यासक.

स्वच्छ हवेसाठी 25 कोटींची ‘धुळदान’
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातून कोल्हापूर शहरासाठी 25 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याचा योग्य पद्धतीने वापर होताना दिसून येत नाही. मोफत दिलेली गॅस दहिनी वापराविना स्क्रॅप झाली असताना पुन्हा पंचगंगा स्मशानभूमीत याच निधीतून गॅस दाहिनी बसविण्यात येत आहे. तीन ठिकाणी मिस्ट टाईप फाऊंटन बसविले आहेत. परंतू ते नेहमी बंद असतात. बिंदू चोकात व्हर्टीकल गार्डन 33 लाख खर्च केले आहेत. परंतू यातून किती हवा स्वच्छ झाली याची माहिती अजतागायत समोर आलेली नाही. 24 टिपर घेतले आहेत.

शहर हवेची गुणवत्ता निर्देशांक
कोल्हापूर-110, ठाणे-92, सोलापूर-109, पुणे-155, पिंपरी-चिंचवड-140, नवी मुंबई-149, नाशिक-152, जळगांव-87, दिल्ली-294, कोलम-46, कांचीपुरम-35, मदुराई-37, बेळगांव-71, बागलकोट-143, नोएडा-213, ग्रेटर नोएडा-262, हैदराबाद-120, तिरूपती-133, वारणसी -56, दिल्ली -294, दुर्गापूर-270, गाझियाबाद-224, पटणा-279, हजीपूर-340.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article