थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज
सकाळपासूनच मटन फिश चिकन घेण्यासाठी गर्दी
कोल्हापूर:
नववर्षाच्या स्वागतासाठी जगभरात रोषणाई केली जाते. तर स्वागतासाठीच्या पार्ट्यांचाही दणका असतो. सगळीकडे जोरदार तय्यारी सुरु असते. अशातच कोल्हापूरकरही मागे नाहीत. आज कोल्हापुरात 31 डिसेंम्बरच्या पार्ट्यांचे जोरदार नियोजन सुरू आहे. सकाळपासूनच चिकन, मटण सोबतच मासे खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदा ही कोल्हापूरकरांनी आपल्या मित्र परिवारासोबत आणि फॅमिली सोबत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याचं ठरवलं आहे. तर यामुळे यंदा घरगुती जेवण बनवून देणाऱ्यांना ही मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत आहेत. तर ठीक ठिकाणी रस्सा मंडळ सज्ज होत आहेत. मटन व चिकन प्रमाणे मच्छी मार्केटमध्ये देखील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून सुरमई, बांगडा, पापलेट, ब्राँज खरेदीकडे नागरिकांचा कल पहायला मिळत आहे.