कोल्हापूरी गुळाला घरघर: तप्त शेतकऱ्यांनी पाडले गुळ सौदे बंद
साखर मिश्रीत कर्नाटकी गुळामुळे कोल्हापूरी गुळाचे दर पडले
बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना नोटीसा
कोल्हापूर
कर्नाटक येथील रायबागमधील साखर मिश्रीत गुळाची विक्री सौद्यामध्ये न आणता थेट व्यापाऱ्याकडून विक्री केली जात आहे. यामुळे गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूरी गुळाच्या दरामध्ये घसरण सुरू झाली आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी कोल्हापूर बाजार समितीमधील गुळ विभागामधील गुळ सौदे बंद पाडण्यात आले. याबाबत बाजार समितीमध्ये बैठक होऊन, कर्नाटकी गुळाबाबत व्यापाऱ्यांना नोटीसा काढण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.
दिवाळी पाडव्यादिवशी गुळ सौदे काढण्यात आले. या सौद्यामध्ये कोल्हापूरी गुळाला क्विंटलला साडे पाच हजार रूपये दर निघाला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या गुळाला चांगला दर मिळणार अशी अपेक्षा होती. पण कर्नाटक येथील रायबागमधील साखर मिश्रीत गुळाची आवक कोल्हापूरात मोठया प्रमाणात सुरू झाली आहे. कोल्हापूरी गुळापेक्षा कर्नाटकी गुळ स्वस्त असल्याने, तसेच हा गुळ सौद्यामध्ये न आणता थेट बहेरच्या बाहेर विक्री केली जात आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने, संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी गुळ सोदे बंद पाडले. तत्पूर्वी अर्धातास गुळ सौदे सुरू होते. सौद्यामध्ये गुळाचा दर 3600 ते 4100 तर सरासरी 3800 रूपये निघाल्याने, संतप्त शेतकऱ्यांना सैदे बंद पाडण्याशिवाय पर्याय नव्हता.
व्यापाऱ्याकडून कर्नाटकी गुळ थेट गुऱ्हाळामधून खरेदी
कर्नाटक येथील रायबाग येथे मोठी गुऱ्हाळे आहेत. साखरेचा वापर करून,हा गुळ सांगली मार्केटसह कोल्हापूरात ही आवक होत आहे. साखरेमुळे कोल्हापूरी गुळापेक्षा कर्नाटकी गुळ स्वस्त असल्याने, व्यापारी थेट गुऱ्हाळामधून कर्नाटकी गुळाची खरेदी करू लागले आहेत. हा गुळ सौद्यामध्ये न आणता, थेट गुजरातला पाठवला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. हा कर्नाटकी गुळ कोल्हापूरात सौद्यामध्ये येत नसल्याने, कोल्हापूरी गुळाचा दर ही घसरू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. कर्नाटकी गुळामुळे सांगली मार्केट यार्डमधील गुळ सोदी व विक्री ही थंडावली आहे.
कांही व्यापाऱ्यांनी गाठले गुजरात
गेल्या आठ वर्षात कांही लोकांचे लाखो रूपये अडकले आहेत. या व्यापाऱ्यांनी कोल्हापूर सोडले असून ,त्यांची वसूली अजूनही झाली नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत बाजार समितीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे तसेच आवक होणाऱ्या कर्नाटकी गुळाबाबत नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याच्या संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत होत्या.
सोमवारी सौदे बंद पडल्याने, खडबडून जागे झालेल्या, संचालकांनी बाजार समितीच्या कार्यालयामध्ये तात्काळ बैठक घेतली. सभापती, माजी सभापती ,सचिव यांची बैठक होऊन, कर्नाटकी गुळाची आवक करणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीसा काढल्या असल्याचे सांगण्यात आले. सौदे बंदबाबत बाजार समिती व कांही व्यापाऱ्याशी संपर्पं साधला असता अधिक माहीती मिळू शकली नाही.