Kolhapur Zilla Parishad Election | कोल्हापूर जिल्हा परिषद निकाल जाहीर; 'राष्ट्रवादी' ठरला सर्वात मोठा पक्ष
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत नवे राजकीय समीकरण
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून जिल्ह्यातील राजकारणात नवी समीकरणं तयार झाली आहेत. या निकालात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात कोल्हापूरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून मते दिल्याचं पाहायला मिळत आहे . कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असून राष्ट्रवादी काँग्रेसने २० जागांवर विजय मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे.
तर काँग्रेसने १५ जागांवर यश मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर भाजपला १२ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. शिवसेनेने ९ जागांवर विजय मिळवला असून जनसुराज्य पक्षाने ६ जागा जिंकत आपली उपस्थिती ठळक केली आहे.
याशिवाय रा. शाहू आघाडीने ४ जागांवर विजय मिळवला आहे.तर सगळ्यात कमी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा तर शिवसेना उबाठाला १ जागा मिळाली आहे.
या निकालामुळे जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत कोणालाही मिळालेलं नसून सत्तास्थापनेसाठी आता आघाडी–युतींचे गणित महत्त्वाचं ठरणार आहे. कोण कोणासोबत जाणार, अध्यक्षपदावर कोणाचा दावा असेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद पक्षीय अंतिम बलाबल
राष्ट्रवादी 20
काँग्रेस 15
भाजप 12
शिवसेना 9
जनसुराज्य 6
रा. शाहू आघाडी 4
स्वाभिमानी शेतकरी संघटना 1
शिवसेना उबाटा 1