For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

दोन दिवस कोल्हापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत !

10:31 AM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
दोन दिवस कोल्हापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत
Advertisement

कोल्हापूर: काळम्मावाडी योजनेच्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवरील एक्स्प्रेस फिडर लाईनवर आयसोलेटर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने उपसा केंद्राचा विद्युतपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे सोमवार (दि. २६) व सोमवार, मंगळवारी अनेक भागांना कमी दाबाने, अपुरा पाणीपुरवठा मंगळवारी (दि. २७) शहरातील नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

Advertisement

या कालावधीत नागरिकांची पाण्याची गैरसोय कमी करण्यासाठी शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे. मात्र, उपलब्ध पर्यायी व्यवस्थेमुळे शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे ए आणि बी वॉर्डमधील शिवाजी पेठ, मंगळवार पेठेसह ई वॉर्डातील उपनगरे, कॉलनींना अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. महापालिकेच्या वतीने पर्यायी पंपिंग व्यवस्थेद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असला, तरी नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.