For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Moharram | मोहरमच्या सातव्या दिवशी कोल्हापूर गजबजलं; पंजे भेटींनी रंगली रात्र

12:32 PM Jun 25, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur moharram    मोहरमच्या सातव्या दिवशी कोल्हापूर गजबजलं  पंजे भेटींनी रंगली रात्र
Advertisement

कोल्हापूर -हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मोहरमच्या सातव्या दिवशी बुधवार दि. २४ रोजी शहरातील विविध भागांत पारंपरिक वाद्यांच्या गजरासह साऊंड सिस्टीमच्या दणदणाटात पंजे भेटींचा सोहळा उत्साहात पार पडला. दरम्यान, काही काळ मिरवणूक मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.

Advertisement

शहरातील विविध तालीम मंडळे, सार्वजनिक मंडळे आणि दर्त्यांमधून उभारण्यात आलेले पंजे एकमेकांच्या भेटीसाठी मिरवणुकांद्वारे मार्गस्थ झाले. ढोल, ताशे, हलगी, सनई-चौघडा यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या गजराने वातावरण भक्तीमय झाले होते. तर युवकांनी साऊंडसिस्टिमच्या तालावर उत्साहाने सहभाग घेतल्याने शहरातील प्रमुख रस्ते गजबजून गेले होते. मोहरमच्या निमित्ताने शहरातील विविध भागांमध्ये रात्री उशिरापर्यंतपंजे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. अनेक ठिकाणी नैवेद्य अर्पण करून भक्तांनी श्रद्धा व्यक्त केली. मुस्लिम बांधवांसह हिंदू समाजातील नागरिकही मोठ्या संख्येने या धार्मिक सोहळ्यांत सहभागी होत असल्याने सामाजिक ऐक्याचे दर्शन घडत आहे.

राजारामपुरी, शाहूपुरी, दौलतनगर, रविवार पेठ, बुधवार पेठ, शिवाजी पेठ,मंगळवार पेठेसह शहरातील मानाचे पंजे बुधवारी सायंकाळी भेटीसाठी बाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत पंजे भेटीचा सोहळा सुरू होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घुडणपीर, बाबूजमाल दर्गा, नंगीवली तालीम मंडळ, दिलबहार तालीम मंडळासह भागातील पंजे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दीपाहायला मिळाली.

Advertisement

दरम्यान, आज गुरुवार २५ रोजी मोहरममधील महत्वाचा मानला जाणारा 'खत्तल रात्र" सोहळा विविध भागांत पार पडणार आहे. या पारंपरिक धार्मिक विधीकडे भाविकांचे विशेष लक्ष लागून आहे. शुक्रबार २६ रोजी पंजे विसर्जन मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.