वारणानगर येथे रोजगार मेळाव्यात ३ लाखाचे पॅकेज; ३०० हुन अधिक उमेदवारांची निवड
पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद
वारणानगर / प्रतिनिधी
येथे आयोजीत पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्यास तेराशे पेक्षा अधिक असा उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला यामध्ये ३ लाखाचे पॅकेज,३०० हुन अधिक उमेदवारांची निवड झाली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता, आणि नावीन्यत्या विभाग महाराष्ट्र शासन आणि कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता विभागीय आयुक्तालय, पुणे तसेच श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा तात्यासाहेब कोरे विद्यानगरी, वारणानगर येथे पार पडला.
पश्चिम महाराष्ट्रातील शाहुवाडी-पन्हाळा तालुक्यातील दुर्गम भागातील हुशार, प्रामाणिक तरुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध होत नसल्यामुळे पात्र आणि सक्षम उमेदवारांवर महानगरांमध्ये नोकरीच्या शोधात भटकंती करण्याची वेळ येते.
अशा गरजु उमेदवारांना आणि नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांना श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या माध्यमातून आम्ही एका छताखाली आणून रोजगाराच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध करू शकल्याने श्री वारणा सहकारी विविध आणि शिक्षण समुहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी समाधान व्यक्त करून भविष्यात रोजगाराभिमुख शिक्षण वारणा शिक्षण समूहाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचं मानस असल्याचे नमूद केले.
दहावी नापास उमेदवारापासून विविध क्षेत्रातील पदवीका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून अशा महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पात्र उमेदवारांना नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याच्या आपल्या स्वप्नांना गवसणी घालता येऊ शकते. तसेच उमेदवारांना कौशल्यपूर्ण तथा रोजगारक्षम बनवण्याच्या उद्देशाने शासनाच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हा या महारोजगार मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे कौशल्य विकास रोजगार उत्पादकता, कोल्हापूरचे सहाय्यक आयुक्त संजय माळी, यांनी केले.
श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीन्नी यांनी कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक दरम्यान वारणेतील ह्या रोजगार मेळाव्याचे वेगळेपण अधोरेखित केले.
या मेळाव्यात बीव्हीजी इंडिया लिमिटेड, क्युएस् कोर्प, युथ फाउंडेशन, बीएस्एफ् फायनान्स, घाडगे पाटील इंडस्ट्रीज, पी ए एम् एस्, आयसीआयसीआय बँक, कोल्हापूर कॅन्सर सेंटर इत्यादी ४० हुन अधिक नामांकित कंपन्यांनी सहभागी होत दहावी पास-नापास, बारावी, डिप्लोमा, बीए, बीकॉम, बीएससी, इंजीनियरिंग, फार्मसी, आयटीआय इ. सर्व प्रकारच्या उमेदवार विद्यार्थ्यांची निवड केली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात निवड पत्राचे वितरण करण्यात आले त्यामध्ये शुभम एकनाथ व्हटकर याची टोटल टेक सर्व्हर, पुणे या कंपनीत ज्युनिअर इंजिनिअर पदी निवड झाली असून तीन लाखाचे पॅकेज मिळाले आहे.
कार्यक्रमासाठी कौशल्य विकास पुणेचे परिविक्षाधीन सहाय्यक आयुक्त सुरज महाजन, प्राचार्य डॉ. एस्. व्ही आणेकर, प्राचार्य डॉ. ए. एम्. शेख, प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा, प्राचार्य बी. आय. कुंभार आदी उपस्थित होते.
आभार प्रदर्शन प्रा. पी. जे. पाटील तर सूत्रसंचालन प्रा. नामदेव चोपडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल फल्ले, डॉ. पी. एस्. चिकुर्डेकर,आण्णासो पाटील, डॉ. पी. एम्. भोजे, डॉ. डी. एम्. पाटील,अमर पाटील, डॉ. पी. एस्. पाटील,प्रितेश लोले,पी. पी. पाटील, डॉ. के. एस्. पाटील तथा श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ अंतर्गत सर्व महाविद्यालयातील विद्यासेवकांनी तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे अमोल जाधव आणि सौ खंदारे यानी विशेष परिश्रम घेतले.