गरिबांचा 'फ्रीज' बनवणारं कोल्हापूर जिल्ह्यातलं हे अनोखं गाव......
कोल्हापूर
अंगाची होणारी लाही-लाही आणि घशाला पडणारी कोरडं यामुळे तीव्र उन्हाच्या झळा आता अवघ्या महाराष्ट्रभर बसायला सुरुवात झाली आहे, माथ्यावर आग ओकणारा सूर्य आणि उन्हामुळे अंगाला बसणारे चटके यामुळे पोटाला काहीतरी थंडगार हवचं. पोटाच्या थंडाव्यासाठी शीतपेय आणि फ्रिजमधील गार पाण्याने अनेकजण आपली तहान भागावण्याचा प्रयत्न करतात मात्र मातीपासून बनवलेल्या ठुमदार माठातील पाण्याची सर कशालाच नाही,
नैसर्गिक थंडावा आणि शमणारी तहान यामुळं मातीच्या मठांना ऐन उन्हाळ्यात मागणी वाढली आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील वारनूळ हे संपूर्ण गावाचं मातीचे माठ बनवत, या गावात बनलेल्या दर्जेदार माठांना कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटकमध्ये चांगली मागणी आहे, माठाच्या विक्रीतून गावाची लाखोंची उलाढाल होत आहे.
यागावाची मातीकामाची परंपरा जवळजवळ १५० वर्षांपूर्वीची आहे. गावातील कुटुंबियांची तिसरी पिढी या कामाची परंपरा राबवत आहे. या गावात बनलेले माती माठ यांना कोल्हापूरसर कराड, सांगली, सातारा, इचलकरंजी, वैभववाडी, रत्नागिरी, राजापूर अशा अनेक ठिकाणी मागणी आहे. ज्या मातीमध्ये पीक येत नाही पाणी धरू ठेवण्याची क्षमता असणारी माती या कामासाठी लागते. ही माती नदी किनारी मिळते.
या गावातील तरुण सुशिक्षित आहेत, पण सध्या नोकरी मिळणे आणि टिकणे हे सहजासहजी शक्य नसल्यामुळे पुढच्या पिढीनेही या वडिलोपार्जित उद्योगाचा स्विकार केलेला आहे.
जाणून घेऊया या गावाबद्दल.......