For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वरणगे येथिल स्मशानभूमीत खळबळ ! हॉस्पिटलच्या निष्काळजीपणाने मृतदेह बदलला

12:59 PM Mar 01, 2024 IST | Abhijeet Khandekar
वरणगे येथिल स्मशानभूमीत खळबळ   हॉस्पिटलच्या निष्काळजीपणाने मृतदेह बदलला
Kolhapur Varange
Advertisement

प्रयाग चिखली वार्ताहर

करवीर तालुक्यातील वरणगे येथील मयत झालेल्या तरुणाचा मृतदेहच बदलल्यामुळे ऐन अंत्यसंस्कारावेळीच स्मशान शेडमध्ये जमा झालेले पै- पाहुणे, नातेवाईक आणि ग्रामस्थात खळबळ उडाल्याची घटना घडली. मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटल मधील गलथान कारभारामुळे ग्रामस्थ- पै पाहुण्यांना नाहक त्रास सहन करावा लागल्याने अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या लोकांनी हॉस्पिटलचा तीव्र निषेध नोंदवला आणि या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही केली आहे.

Advertisement

वरणगे येथील भैरवनाथ हायस्कूल कडे शिपाई पदावर काम करणारा कृष्णात महादेव पाटील हा तरुण गेल्या दहा दिवसापासून आजारी होता त्याचा आजार बळावल्यामुळे त्याला मुंबई वाशिम येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना कृष्णात महादेव पाटील हा तरुण गुरुवारी दि.२९रोजी पहाटे आकस्मिक मयत झाला. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये त्याची पत्नी मेघा आणि उपस्थित होते. वय अवघे ४७ आणि तब्येतीने धष्टपुष्ट दिसणाऱ्या आपल्या घरातील कुटुंबप्रमुखाचा आकस्मिक मृत्यू झाल्याने त्यांची पत्नी मेघा व भाऊ भेदरलेल्या अवस्थेत होते. यावेळी हॉस्पिटल प्रशासनाने कृष्णात पाटील यांच्या नातेवाईकांना मयत कृष्णात च्या मृतदेह ऐवजी नावाच्या ७६ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कापडामध्ये गुंडाळून दिला. तो मृतदेह घेऊन नातेवाईक ॲम्बुलन्स द्वारे मुंबई ते वरणगे असा सहा तासाचा प्रवास करत आले. यावेळी मृतदेह कापडामध्ये गुंडाळल्यामुळे सदरचा मृतदेह ग्रामस्थांनी थेट स्मशान शेडमध्ये अंत्यसंस्कारासाठी नेला. रितीरिवाज प्रमाणे मृतदेहाला शेवटचे पाणी पाजण्यासाठी मृतदेहाच्या चेहऱ्यावरील कापड हटवले त्यावेळी हा मृतदेह कृष्णात यांचा नसून दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे त्याचा मुलगा प्रसाद याने ओळखले हे बाब ग्रामस्थ व नातेवाईकांच्या निदर्शनास आली आणि एकच खळबळ माजली. यावेळी संबंधित रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला लोकांनी धारेवर धरले तसेच हॉस्पिटलमध्ये फोन करून मृतदेह बदलल्याची घटना सांगितली त्यावेळी हॉस्पिटल कडून झालेली चूक मान्य करून कृष्णात यांचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये आहे तो पुन्हा घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांनी यावे असे सांगितले. दरम्यान कृष्णात यांच्या अंत्यसंस्कारासाठी एक हजारावर लोक स्मशान शेड मध्ये दाखल झाले होते. या घटनेमुळे या लोकांना प्रचंड मनस्ताप झाला आणि नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला हॉस्पिटलच्या या कारभाराबाबत चौकशीची मागणी ही उपस्थित आणि प्रसारमाध्यमान पुढे मांडली. दरम्यान उपस्थित शोकाकुल लोक हळूहळू माघारी फिरले.

पुन्हा एकदा चुकीच्या मृतदेहाला घेऊन ॲम्बुलन्स मुंबईकडे रवाना झाली सकाळी दहा वाजलेपासून मृतदेहाच्या प्रतीक्षेत ताटकळत बसलेले लोक पै पाहुणे सायंकाळी पाच वाजता माघारी फिरले. पुन्हा एकदा येणाऱ्या मृतदेहाची रात्री उशिरापर्यंत वाट पहात नातेवाईक थांबले. रात्री उशिरापर्यंत मृतदेह आला नाही. हॉस्पिटलच्या बेजबाबदार आणि गलथान कारभारामुळे उपस्थित सर्वांनाच मनस्ताप झाला.

Advertisement

मयत कृष्णात पाटील हा तरुण येथील भैरवनाथ हायस्कूल कडे शिपाई पदावर काम करत होता अत्यंत कष्टातून संसार करत त्यांनी एका मुलग्याला डॉक्टर तर एका मुलग्याला अधिकारी बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते त्याने अलीकडेच एका मुलग्याला बी ए एम एस साठी प्रवेश घेऊन दिला होता. तर दुसऱ्याला चांगल्या संस्थेत शिक्षण देऊन स्पर्धा परीक्षेची अकॅडमी लावली होती. परंतु त्याचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच काळाने कृष्णातवर झडप घातली त्याचे मनमिळाऊ जिद्दी, कष्टाळू आणि लोभस व्यक्तिमत्त्वाच्या कृष्णातचे अकाली निधन आणि त्याचा मृतदेह बदलल्याच्या घटनेमुळे गाव परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मयत कृष्णा यांच्या पक्षात पत्नी दोन मुलगे आई असा परिवार आहे.

Advertisement
Tags :

.