For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खोकल्याचं औषध समजून किटकनाशक प्यायल्याने शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यु

05:58 PM Jul 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
खोकल्याचं औषध समजून किटकनाशक प्यायल्याने शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यु
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे गावामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून खोकल्याचे औषध समजून किटकनाशक औषध प्यायल्याने एका शाळकरी मुलाचा मृत्यु झाला आहे. या घटनेमुळे आमजाई- व्हरवडे गावाला धक्का बसला असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

वेदांत अशोक पाटील असे नाव असलेल्या ११ वर्षीय शाळकरी मुलगा गडबडीत शाळेला जात असताना त्याने खोकल्याने औषध समजून शेतावर फवारण्यासाठी आणलेले किटकनाशक आौषध प्राशन केले. शाळेत गेल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तातडीने सीपीआर दवाखान्यामध्ये पळवण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. त्याच्या या मृत्युने कुटुंबाला मोठा धक्का बसला असून गावावर शोककळा पसरली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.