Kolhapur Traffic : रंकाळा टॉवर चौक नेहमीच वाहनांच्या वर्दळीत, नित्याचीच वाहतूक कोंडी
रंकाळा स्टॅण्ड ते फुलेवाडी रस्ता वाहतुकीच्या कोंडीत अडकला आहे
By : रुपाली चव्हाण
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्ते अतिशय अरुंद आहेत. रस्ते लहान वाहने जादा अशी स्थिती आहे. त्यातच खड्ड्यांची झालेली चाळण, यामुळे शहरातील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. रस्त्यावर वर्षानूवर्ष डांबरीकरण न केल्याने खड्यांचे साम्राज्य आहे. शहरातील सार्वजनिक समस्या म्हणजे पाणी, कचरा, व वाहतूक कोंडी.
यामध्ये रंकाळा स्टॅण्ड ते फुलेवाडी रस्ता वाहतुकीच्या कोंडीत अडकला आहे. रंकाळा एसटी स्टॅन्ड चौक, रिक्षा स्टॉप रंकाळा स्टॅण्ड हे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. येथून ग्रामीण भागामध्ये बसेस धावत आहेत. प्रवाशांची गर्दी, रिक्षा स्टॉपवरील रिक्षा व प्रवासी यांची मोठी गर्दी या परिसरात दिसत आहे.
स्टॅन्डकडून फुलेवाडी, बालिंगा, गगनबावडा या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी असते. कारण या मार्गावर खाऊगल्ली, दुकाने, मॉ ल्स, रस्त्यावर असणारी फळे व भाजी गाड्यांची संख्या बेसुमार आहे. यामुळे हा रस्ता नेहमीच बर्दळीचा ठरत आहे. त्यातच रंकाळा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे येथील परिसर नेहमीच फुल्ल असतो. शहर वाहतूक विभागाने हा रस्ता एकेरी करण्याची चाचणी केली, पण हवा तसा परिणाम दिसत नाही आहे.
जावळाचा गणपती ते फुलेवाडी मार्गावर पर्यायी रस्ता
क्रशर चौकातही कोंडी रंकाळा स्टॅण्ड ते फुलेवाडीसाठी या रस्त्याला क्रशर चौक ते दत मंगल कार्यालय हा पर्यायी रस्ता आहे. क्रशर चौकात सिग्नल असून, येथूनही मोठी वाहतुकीची कोंडी होत असते. या कोल्हापूर शहरातील रस्ते अतिशय अरुंद आहेत. रस्ते लहान वाहने जादा अशी स्थिती आहे. त्यातच खड्ड्यांची झालेली चाळण, यामुळे शहरातील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.
रस्त्यावर वर्षानूवर्ष डांबरीकरण न केल्याने खड्यांचे साम्राज्य आहे. शहरातील सार्वजनिक समस्या म्हणजे पाणी, कचरा, व वाहतूक कोंडी. यामध्ये रंकाळा स्टॅण्ड ते फुलेवाडी रस्ता वाहतुकीच्या कोंडीत अडकला आहे. दोन्ही रस्त्यांमुळे जनतेतून पर्यायी रस्त्याची मागणी होत आहे.
खाऊ गल्लीत ही गर्दी
या रोडशेजारी खाऊगल्ली उभारली आहे. सायंकाळी खाऊगल्लीत मोठी गर्दी असते. या समोरच उंच-उंच पाळणे बसवण्यात आले आहेत. मध्यावर्ती भागात असे पाळणे बसवण्यासाठी परवानगी आहे काय, असे जनतेतून बोलले जात आहे. येथे खाऊ गल्लीचा कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तसेच पार्किंगचा बोजबारा सिग्नलची गैरसोय असून स्पीड ब्रेकर नाही.
उड्डाण पूल आवश्यक
रंकाळा टॉवर किंवा रंकाळा स्टॅन्ड परिसरात उड्डाणपूल झाल्यास वाहतूक गतीने आणि सोयस्कर होणार आहे.
वाहने जास्त, पार्किंगला जागा अपुरी शहरात वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. शहरातील अरूंद रस्ते आणि पार्किंगसाठी जागेचा अभाव असल्याने अनेक वाहने रस्त्याच्याकडेला च पार्क केली जातात.
शहरातील अंबाबाई मंदिर, रंकाळा टॉवर, शिवाजी पेठ, इतर ठिकाणी पार्किंगची समस्या गंभीर आहे. रहिवासीयांनी वाहनांच्या पार्किंगची स्वतःची सोय केलेली नाही. वाहने घराबाहेर रस्त्याकडेला पार्क केली जातात.
रंकाळ्यात प्लास्टिक बाटल्या, कचऱ्याचे साम्राज्य
या रंकाळ्यात कचरा प्लास्टिकच्या बाटल्या, थरमाकॉल कचरा टाकण्यात येत आहे. बाजूला हार, फुले या कचऱ्याचे ढीग पडलेले दिसत आहे. या मार्गावरही खड्डेच खड्डे असल्याने पावसाळ्यात दुचाकींचे अपघात होत असतात.
शालिनी पॅलेस ते बालिंगा रोड धोकादायक
शालिनी पॅलेससमोर डी मार्टकडे खरेदीसाठी लोक बळत असतात. यामुळे दुचाकी, चार चाकी वाहनधारकांची गर्दी असते. या कॉ र्नरला स्पीड ब्रेकर नसल्याने, फुलेवाडी बालिंगाकडून येणाऱ्या गाड्या वळण घेताना येथे अपघात होण्याचे प्रकार होत असतात
पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते
"रस्ते अरुंद असल्याने या मार्गावर सतत गर्दी असते. बाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक वाढली आहे. खाऊगल्लीचे अतिक्रमण असल्याने, रस्ता फार अरुंद आहेत. येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. रंकाळ्यावरील प्रदूषणाकडे महापालिकेने लक्ष देणे गरजे आहे."
- निवास पाटील, स्थानिक नागरिक