For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'अ‍ॅग्रीस्टॅक’मध्ये कोल्हापूर राज्यात टॉपवर

01:55 PM Feb 05, 2025 IST | Radhika Patil
 अ‍ॅग्रीस्टॅक’मध्ये कोल्हापूर राज्यात टॉपवर
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

जिह्यातील 11 लाख 50 हजार शेतकऱ्यांनी अॅग्री स्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढून देण्याचे काम सुरू आहे. यापैकी 1 लाख 51 हजार 964 शेतक्रयांनी नोंदणी करून फार्मर आयडी काढले आहेत. राज्यात कोल्हापूर जिल्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. तसेच फार्मर आयडीसाठी उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी गतीने करण्याच्या सूचना त्यांनी तालुकास्तरीय यंत्रणेला केल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहातून व्हीसीद्वारे त्यांनी तालुका प्रशासनाशी संवाद साधला. यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल डॉ. संपत खिलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, प्रांत अधिकारी हरीश धार्मिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, तहसीलदार स्वप्नील रावडे, आयुष्यमान भारतचे नोडल डॉ.रोहित तसेच तालुका स्तरावरून उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

कोल्हापूर जिल्हा दीड लाख शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करून देण्यात आले आहेत. यानुसार राज्यात कोल्हापूर पाचव्या क्रमांकावर आहे. याच प्रकारे जिह्यात अॅग्री स्टॅकचे काम सुरू राहिले तर फेब्रुवारी अखेर संपूर्ण जिह्यातील 11 लाख 50 हजार शेतकऱ्यांची फॉर्म आयडी काढून होतील. त्यामुळे प्रत्येक गावातील सुरू असलेल्या कॅम्पला गती देऊन सर्व फार्मर आयडी वेळेत पूर्ण होतील यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी केल्या. प्राधान्याने प्रधानमंत्री किसान योजनेमधील लाभार्थ्यांचेही फार्मर आयडी काढण्याचे निर्देश त्यांनी दिले. गावामध्ये सुरू असलेल्या कॅम्प वेळी आरोग्य विभाग व गाव स्तरावरील आशाच्या मदतीने ठिकठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी, नागरिकांचे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कार्ड काढून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

  • किसान योजनेतील लाभार्थ्यांना प्राधान्य द्या

जिह्यात प्रधानमंत्री किसान योजनेमधील लाभार्थ्यांची संख्या ही 4 लाख 96 हजार आहे. या सर्व शेतकऱ्यांच फार्मर आयडी प्राधान्याने काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. पीएम किसान अंतर्गत शेतक्रयांना 19 व्या हप्त्याचे वाटप करण्यात येणार आहे. या अगोदार शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.