कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ दिंडी रौप्यमहोत्सवी
कोल्हापूर / संग्राम काटकर :
आषाढी एकादशीनिमित्त सुरु केलेली कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळमधील विठ्ठल मंदिर या पायी दिंडीचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्षे आहे. मिरजकर तिकटीजवळील विठ्ठल मंदिराजवळून 75 जणांच्या साथीने सुऊ झालेली दिंडी आता 30 ते 40 हजारावर वारकरी व विठ्ठलभक्तांच्या सहभागाने अजरामर झाली आहे. तसेच ऊईकर कॉलनी ज्ञानेश्वर हरी काटकर महाराज-साहेबांची प्रेरणा लाभलेली हीच दिंडीची कोल्हापूरी वैभव बनली आहे. भरपावसात निघणाऱ्या दिंडीत पावलो-पावली माऊलीला दिली जाणारी हाक, अभंग व टाळमृदंगाच्या गजराने भाविक समाधान पावताहेत. पुईखडी व खंडोबा तालीमजवळ होणाऱ्या रिंगण सोहळ्याने तर विशाल रुप घेतले आहे.
पंढरपूर मार्गावर केल्या जाणाऱ्या रिंगण सोहळ्या इतका मोठा रिंगण सोहळा पुईखडीवर होत आहे. हेच कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ दिंडीचे वैशिष्ठ्याच म्हणावे लागेल. ही दिंडी सुऊ होण्यामागे संतश्रेष्ट ज्ञानेश्वर भक्तीचेच कारण महत्वपूर्ण ठरले आहे.
- ....म्हणून दिंडीला सुरुवात झाली
मंगळवार पेठ, नाथागोळा तालीम येथील ज्ञानेश्वर भक्त रंगराव पोवार यांनी घरी ज्ञानेश्वरांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. 2000 साली रंगराव व त्यांचा मुलगा बाळासाहेब पोवार यांनी प्र्रज्ञापुरीतील ज्ञानेश्वर हरी काटकर साहेब यांना घरातील ज्ञानेश्वरांच्या मूर्तीची माहिती दिली. हे ऐकून प्रभावीत झालेले काटकर साहेब यांनी घरी ज्ञानेश्वरांची मूर्ती पूजताय तर आता दिंडीला सुऊ करा असे सांगितले. त्यानुसार 2000 सालच्या आषाढी एकादशीदिवशी कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर मानलेल्या नंदवाळमधील विठ्ठल मंदिराकडे जाणारी दिंडी रंगराव पोवार, बाळासाहेब पोवार, दीपक गौड, आनंदराव लाड महाराज, खंडेराव जाधव, सुरेश जाधव, राजेंद्र पाटील व जय शिवराय फुटबॉल प्लेअर तऊण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुऊ केली. मिरजकर तिकटीजवळील विठ्ठल मंदिराजवळून सुऊ केलेल्या पहिल्या दिंडीत 75 वारकरी, विठ्ठलभक्त सहभागी झाले. दिंडीसाठी पॉप्युलर स्टील वर्क्सने दिलेल्या लोखंडी पालखीतून ज्ञानेश्वरांची मूर्ती नंदवाळकडे नेली. पुईखडीवर रिंगण सोहळाही सुऊ केला. आषाढीच्या पुर्वसंध्येला नगरप्रदक्षिणेचीही परंपराही सुरु केली.
2005 पासून दिंडीचे वाढले वैभव
2005 साली खऱ्या अर्थाने दिंडीची व्याप्ती वाढली. या वर्षाच्या आषाढी एकादशीला आयोजित दिंडीत अनेक गावांमधील वारकरी व सात ते आठ हजार भाविक सहभागी झाले. तसेच 2005 पासूनच पुईखडी होणाऱ्या रिंगण सोहळ्याचे महत्वही अधोरेखित झाले. माऊलीच्या अश्वांकडून पूर्ण केला जाणारा रिंगण सोहळा पाहण्यासाठीही याच वर्षांपासून सुऊवात झाली. 2007 साली दिंडीसाठी पॉप्युलर स्टील वर्क्सने प्लायवूडपासून बनवलेला रथ दिला. या रथासोबत 10 हजारावर वारकरी, विणेकर, मृदंग वादक, टाळकरी, तुळशी वृंदावन डोईवर घेतलेल्या महिला व विठ्ठल भक्त नंदवाळच्या विठ्ठल मंदिराच्या भेटीला गेले. दिंडीचा वाढवा विस्तार लक्षात घेऊन 2009 साली श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ ट्रस्ट स्थापन केले. पुढे ट्रस्ट व जय शिवराय फुटबॉल प्लेअर मंडळामार्फत दिंडी आयोजित होऊ लागली. दरम्यानच्या काळात दिंडीसाठी लाकडी पालखी बनवली. 2013 सालच्या दिंडीसाठी जवाहरनगरातील भक्त रामचंद्र काळे यांनी चांदीच्या पादुका दिल्या. तसेच 2015 साली 10 ते 12 किलो चांदीपासून नक्षीदार भाग बनवून ते मुळच्या लाकडी पालखीला लावले. पाच वर्षांपूर्वी देहूच्या रथासारखा चांदीचा रथ दिंडीत असावा या मागणीने जोर धरला. नेते मंडळी बढाया मारत चांदी जाहीर करत होते. परंतू चांदी काही दिली नाही. त्यामुळे ट्रस्टने चांदी रथ बनवण्याची अपेक्षाच सोडली होती. परंतू आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेऊन 70 किलो चांदी रथासाठी दिली. क्षीरसागर यांनीच गतवर्षी दिलेल्या लाकडी रथाला चांदीचे नक्षीदार भाग लावले गेले. हाच चांदीचा रथ रविवार 6 जुलै रोजीच्या आषाढी एकादशीदिनी आयोजित कोल्हापूर ते नंदवाळ दिंडीत दाखल केला जाणार आहे. हा चांदीचा रथ दिंडीचे महत्व खुलवणार हे मात्र निश्चित. तसेच दिंडी मार्गात विविध कंपन्या, मंडळे, संस्था, उद्योजक, भाविक स्वयंस्फुर्तीने उपवासाचे पदार्थ वाटप करण्यासाठी स्टॉल उभारले जातात. येथील पदार्थातून दिंडीकरांना उर्जा मिळत आहे.
- नगरप्रदक्षिणेत असणार पोलीस बॅण्ड...रविवारी पायी दिंडी...
आषाढी एकादशीच्या पुर्वसंध्येला नगरप्रदक्षिणा आहे. यात भजनी मंडळे व वारकरी पारंपरिक वाद्यांसह पोलीसबॅण्ड असणार आहे. दिंडीचे प्रमुख आकर्षण ठरणारा चांदीचा रथही नगरप्रदक्षिणेत असेल. रविवार 6 जूलै रोजीच्या आषाढी एकादशीदिनी आयोजित कोल्हापूर ते नंदवाळ दिंडीतही चांदीचा रथ असेल. सकाळी 8 वाजता मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरापासून दिंडी सुऊ होईल, असल्याचे पालखी सोहळा ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब पोवार यांनी सांगितले.
-