For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महावितरणच्या पुणे प्रादेशिकस्तरीय नाट्यस्पर्धेत कोल्हापूरचे ‘ती फुलराणी‘ प्रथम

10:36 AM Apr 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
महावितरणच्या पुणे प्रादेशिकस्तरीय नाट्यस्पर्धेत कोल्हापूरचे ‘ती फुलराणी‘ प्रथम
drama competition Mahavitaran
Advertisement

कोल्हापूर / प्रतिनिधी

महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागांतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यास्पर्धेत कोल्हापूर परिमंडलाच्या ‘ती फुलराणी‘ या नाटकास नाट्यानिर्मितीचे प्रथम क्रमांकाचे तर पुणे परिमंडलाच्या ‘अग्निपंख‘ या नाटकास द्वितीय पारितोषिक मिळाले. महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कोल्हापूरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहात दोन दिवशीय नाट्यास्पर्धा पार पडली.

Advertisement

याप्रसंगी नाळे म्हणाले की, वीजसेवेचे काम सांघिक व सहकार्य भावनेने वीज कर्मचारी अविरतपणे करीत असतात. त्याचप्रमाणे विरंगुळा देण्राया नाट्यास्पर्धेतही व्यवसायिक स्तराचा अप्रतिम कलाविष्कार सादर करून रसिकांची उत्सुकता वाढविली. आगामी काळात हीच ऊर्जा घेऊन ग्राहकांना सेवा देण्याचे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नाट्यास्पर्धेत यशस्वी व सहभागी सर्व कलाकारांना त्यांनी शाबासकीची थाप दिली.

याप्रसंगी मुख्य अभियंता परेश भागवत यांनी विद्युत क्षेत्रात तारेवरची कसरत करण्राया कर्मच्रायांकडून नाट्याकलेचे उच्च दर्जाचे सादरीकरण झाल्याबद्दल कौतुक केले. स्पर्धा जिंकण्यापेक्षा स्पर्धेत ताकदीने उतरणे हेच यश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्य अभियंता राजेंद्र पवार, नाट्यापरीक्षक संजय दिवाण,उज्ज्वला खांडेकर, महेश गोटखिंडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्तविक अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी आभार मानले . मुकुंद अंबी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पुणे प्रादेशिक विभागातील अधिकारी -कर्मचारी व कलाकार उपस्थित होते.

Advertisement

व्यक्तिगत गटात अभिनय (पुरुष) - प्रथम- प्रसाद दिवाण (ती फुलराणी, कोल्हापूर), द्वितीय- मंगेश कांबळे ( ती फुलराणी, कोल्हापूर),अभिनय (स्त्राr) - प्रथम- श्वेता सांगलीकर( ती फुलराणी, कोल्हापूर). व्दितीय -अपर्णा मानकीकर ( अग्निपंख, पुणे), अभिनय उत्तेजनार्थ- पौर्णिमा पुरोहीत ( ती फुलराणी, कोल्हापूर), संतोष गहेरवार (अग्निपंख, पुणे), रामचंद्र चव्हाण (विठू माझा लेकुरवाळा),दिग्दर्शन- प्रथम - श्रीकांत सणगर (ती फुलराणी, कोल्हापूर), द्वितीय अरविंद बुलबुले ( अग्निपंख, पुणे), नेपथ्य- प्रथम - नितीन सावर्डेकर, शिवराज आणेकर (ती फुलराणी, कोल्हापूर), द्वितीय राहूल यादव, किशोर अहिवळे, मयुर गंधारे (अग्निपंख, पुणे), प्रकाशयोजना- प्रथम -शकील महात, गिरीष भोसले (ती फुलराणी, कोल्हापूर), द्वितीय -धनराज बिक्कड, संदीप कांबळे, कुमार गवळी (अग्निपंख, पुणे ),पार्श्वसंगीत- प्रथम - संगिता कुसुरकर, विनायक पाटील (ती फुलराणी, कोल्हापूर), द्वितीय राजेंद्र हवालदार, विजय जाधव (अग्निपंख, पुणे),रंगभूषा व वेशभूषा- प्रथम -शुभांगी निंबाळकर, निकिता बोरसे, आशा पाटील (अग्निपंख, पुणे), द्वितीय नजीर मुजावर, बजरंग पवार, रश्मी पाटील, स्मिता हातकर (ती फुलराणी, कोल्हापूर) पारितोषिके मिळाली.

Advertisement
Tags :

.