कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेंगुर्ले , शिरोडा बसस्थानकाची कोल्हापूर स्वच्छता कमिटीकडून तपासणी

04:48 PM Jul 30, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
राज्यपरिवहन महामंडळामार्फत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धे अंतर्गत वेंगुर्ले आगारातील वेंगुर्ले तसेच शिरोडा बसस्थानकाच्या तपासणीस आलेल्या कोल्हापूर विभागाच्या पथकाचे वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी वेंगुर्ले बसस्थानकावर स्वागत केले.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून राज्यातील ३१ जिल्हयातील राज्य परीवहन महामंडळाची आगारे व बसस्थानके यांची तपासणी व्हावी. प्रवाश्यांना सेवा व सुविधा मिळतात कि नाही. याबरोबर आगार व बसस्थानकांत गाड्यासह परीसराची स्वच्छता रहाते कि नाही. याची दरवर्षी पाहणी व्हावी. व त्या दृष्टीने प्रवाशांना सोयी सुविधा कमतरता असलेल्या भागात त्या देण्याच्या उद्देशाने राज्यपरीवहन महामंडळामार्फत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धात्मक स्वरुपात राबविण्यात येत आहे.या स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धेत सहभागी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 18 बस स्थानकांची तपासणी या कोल्हापूर विभागाच्या समिती मार्फत सुरु आहे. शुक्रवारी वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुर्ले बस स्थानक व शिरोडा बस स्थानक या वेंगुर्ले आगाराच्या बस स्थानकाचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या कोल्हापूर विभागाच्या सर्वेक्षण समितीचे प्रमुख कोल्हापूर विभागीय नियंत्रक यशवंत कानतोडे, विभागीय कामगार अधिकारी संदीप भोसले यांचे वेंगुर्ले बस स्थानकावर वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहूल कुंभार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत स्वच्छता सर्वेक्षण कमिटीचे सदस्य ग्राहक पंचायत प्रवासी संघटना वेंगुर्ले चे तालुका अध्यक्ष राधाकृष्ण वेतुरकर, या समितीचे पत्रकार सदस्य प्रतिनीधी दैनिक तरुण भारतचे पत्रकार भरत सातोस्कर, तसेच बस स्थानक प्रमुख तेजस तारी, वेंगुर्लेचे वाहतूक निरीक्षक चंद्रशेखर सावंत प्रमोद परुळेकर, शिरोडा बसस्थानक वहातुक नियंत्रक लालसिंग पवार आदी उपस्थित होते.या स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धेत वर्षभरात वेंगुर्ले आगाराच्या अधिपत्याखाली येणाऱ्या वेंगुर्ले बस स्थानक व शिरोडा बस स्थानक या बस स्थानकातील परिसर, बसेस, वेंगुर्ले आगार परीसर, बस स्थानक स्वच्छतेबरोबरच पर्यावरण पूरक वसुंधरे बाबत केलेले काम, प्रवाशांसाठी केलेल्या सेवा सुविधा प्रवाशांसाठी केलेल्या विविध योजना, प्रवाशांसाठी बसचे वेळापत्रक तसेच अन्य बाबी यांची पाहणी या समितीने प्रत्यक्ष विविध जागेवर जात काटेकोरपणे केली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update#konkan update
Next Article