For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Ganesh Visarjan 2025: प्रेमाने वागा,पण कारवाईत कॉम्प्रमाईज नको

11:33 AM Sep 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
kolhapur ganesh visarjan 2025  प्रेमाने वागा पण कारवाईत कॉम्प्रमाईज नको
Advertisement

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्ताबाबत पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या सूचना

Advertisement

कोल्हापूर: शनिवारी होणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्ताचे शुक्रवारी सायंकाळी पोलीस ग्राउंडवर वाटप करण्यात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताच्या सुचना केल्या.

पोलीस अधीक्षक गुप्ता म्हणाले, पोलीस कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी ७ वाजता बंदोबस्ताच्या ठिकाणी हजर रहावे. दुसच्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत बंदोबस्त असणार आहे. दोन ठिकाणी मिरवणूक वेगवेगळ्या रस्त्याने मुख्य मार्गात मिक्स होत असते.

Advertisement

या ठिकाणी मंडळांना समप्रमाणात सोडण्याची काळजी घ्या. याची व्यवस्थित माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घ्या. संशयास्पद किंवा उपद्रवी व्यक्तींना मार्क करा, मात्र त्यांच्यासोबत जागेवर वाद घालू नका , गोड बोलून त्यांना गर्दीतून बाजुला घेऊन नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये न्या, अशा सूचना दिल्या.

अपर पोलीस अधीक्षक डॉ धीरजकुमार बच्चू यांनी काहिही झाले तरी कर्मचाऱ्यांनी बंदोबस्ताचा पॉईंट सोडून जाऊ नये. नागरीक, मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत संयमाने वागा, त्यांच्यासोबत उद्धटपणे बोलू नका, अशा सूचना केल्या. शहर

पोलीस उपअधिक्षक प्रिया पाटील यांनी , शनिवारी सकाळी ७ वाजता सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यात येणार आहे  बंदोबस्ता संपल्यानंतरी सर्वच कर्मचाऱ्यांची हजेरी होणार आहे. त्यामुळे बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांनी पॉइंट कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडू नये. सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित अॅ क्टीवपणे काम केल्यास कलेक्टिव रिझल्ट मिळेल असे सांगितले. 

पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी पुढील बाबींमध्ये सूचना दिल्या ...

साप्ताहिक सुट्टी रद्द

सर्व पोलिसांच्या शनिवार, रविवारी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व रजा आणि साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ईयर बड्सचे वाटप
विसर्जन मिरवणूकीत बंदोबस्तासाठी असणाऱ्या १५०० अधिकारी, कर्मचाऱ्यांना ईयर बहुसचे वाटप करण्यात आले आहे. बंदोबस्तासाठी असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना दुपारी, रात्रीच्या जेवण आणि पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली. 

पिवळा रेनकोटच सक्तीचा

हवामान खात्याने दोन दिवस पावसाचाअंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्तासाठी येताना सोबत रेनकोट ठेवणे आवश्यक आहे. हा रेनकोट पिवळ्या रंगाचाच असणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे असे रेनकोट नसतील त्यांना याचे वाटप करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक गुप्ता यांनी सांगितले. 

Advertisement
Tags :

.