महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आंतरराष्ट्रीय नेमबाजी पंच युवराज साळोखे यांचे निधन! गोव्यात सुरु असलेल्या स्पर्धेत घेतला अखेरचा श्वास 

09:10 PM Aug 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

भारत सरकारने अधिकृत शासकीय रायफल पंच व प - शिक्षक म्हणून केली होती

Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

Advertisement

आंतरराष्ट्रीय रायफल नेमबाज पंच, तरुणाईला नेमबाजी धडे देणारे गुरु, भारतीय नेमबाजी संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक, व्यवस्थापक, परीक्षक, गोवा रायफल असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अशी विविधांगी जबाबदारी सांभाळत नाव कमवलेले युवराज ऊर्फ बंडा दादासाहेब साळोखे (वय ५३, रा. राजेंद्रनगर) यांचे शुक्रवारी गोवा येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते सध्या नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने सोपवलेल्या जबाबदारीनुसार गोवा येथे सध्या सुरु असलेल्या इंडिया ओपन नेमबाजी स्पर्धेत ऑफिशियल म्हणून काम पाहत होते. दिल्लीतील नॅशनल रायफल असोसिएशनच्या गव्र्व्हनिंग बॉडीवरही ते गोवा राज्यातर्फे सदस्य म्हणून कार्यरत होते. महापालिकेच्या दुधाळी शुटींग रेंजच्या माध्यमातून त्यांनी अनेक नेमबाजांना रायफल शुटींगचे विना मोबदला प्रशिक्षण देण्याचेही काम केले.

रायफल महर्षी (कै.) जयसिंगराव कुसाळे यांच्यापासून प्रेरणा घेऊन युवराज यांनी तीन दशकांपूर्वी दुधाळी शुटींग रेंजवर आंतरराष्ट्रीय नेमबाज रमेश कुसाळे यांच्याकडून नेमबाजीचे धडे घेतले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी स्थानिकपासून राज्यस्तरीय रायफल नेमबाजी स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केले, नेमबाजीत करिअर करायसाठी त्यांनी दहा वर्षांपूर्वी जर्मनीमध्ये जाऊन रायफल शूटिंग इंटरनॅशनल रेफ्री अॅण्ड जज्ज हा कोर्स करुन परीक्षाही दिली. त्यात ते उत्तीर्णही झाले. नेमबाजी व पंचगिरीतील अनुभवाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना शासकीय पंच म्हणून नियुक्त करत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंचगिरी करण्यासाठी मान्यता दिली होती. स्पर्धामध्ये पंचगिरी करत करत नेमबाजीचे प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत राहिले. चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय रायफल नेमबाजी स्पर्धेत युवराज यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक व परीक्षक म्हणूनही काम पाहिले. कोल्हापूर जिल्हा मेन-बूमेन असोसिएशनचे संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. हिल रायडर्सतर्फे आयोजित साहसी गिर्यारोहण मोहिमांच्या आखणीत त्यांचा विशेष पुढाकार असायचा. तीन वर्षापूर्वी शिरोळमध्ये आलेल्या भीषण महापूराच्या वेढ्यात त्यांनी शिरोळवासियांसाठी आयोजित केलेल्या अन्नछत्रात ३० दिवस श्रमदान केले. त्यांनी बुलेट सवारीची आवडही जोपासली होती. आपल्याकडील बुलेट मॉडीफाय करुन ती फिरवण्यात त्यांचा हातखंडा होता. जीप ऑफरोड डायविंगचीही त्यांना आवडही होती. महागड्या ओपन टप जीप, फोर व्हीलर ड्राईव जीप, ओल्ड स्टैंडर्ड कार, बुलेट अशी वाहने त्यांच्याकडे होती. सार्थक क्रिएशनच्या माध्यमातून कोल्हापूर व इतर शासकीय महोत्सवातील विविध कार्यक्रमांसह मंडळांच्या मिरवणूकांमध्ये त्यांनी केलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या वेशभूषा लोकांमध्ये चर्चेचा विषय बनल्या होत्या. गेल्या आठ दिवसांपासून ते गोव्यात सुरु असलेल्या इंडिया ओपन नेमबाजी स्पर्धेत ते ऑफिशियल म्हणून काम पाहत होते. शुक्रवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी दखाखान्यात नेले. मात्र उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव दुपारी गोव्याहून कोल्हापुरातील राजेंद्रनगरातील घरी आणले, सायंकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, बहिण व भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी २५ रोजी सकाळी ९ वाजता आहे.

Advertisement
Tags :
Kolhapur sports Yuvraj Salunkhe pass away Tarun Bharat News
Next Article