महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापूर दक्षिणच्या राजकारणात काँग्रेसला खिंडार

09:34 PM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सतेज पाटील गटाचे खंदे समर्थक संजय वास्कर यांचा भाजपच्या अमल महाडिक यांना पाठिंबा जाहीर

Advertisement

कोल्हापूर

Advertisement

सतेज पाटील गटाचे खंदे समर्थक संजय वास्कर यांनी आज भाजपच्या अमल महाडिक यांना पाठिंबा जाहीर केला. वास्कर यांच्यासह चार ग्रामपंचायत सदस्यांनी सतेज पाटील गटाला सोडचिठ्ठी दिल्यानं काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. मोरेवाडी, पाचगाव, कंदलगाव या भागात प्राबल्य असलेल्या वास्कर यांच्या पाठिंब्यामुळे, अमल महाडिक यांचा दक्षिणमधील विजय सुकर झाला आहे.

मोरेवाडीच्या माजी सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्या मनिषा वास्कर यांच्यासह चार ग्रामपंचायत सदस्यांनी आज सतेज पाटील गटाला रामराम करून कोल्हापूर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे सतेज पाटील गटाला मोठा हादरा बसलाय. मोरेवाडी, पाचगाव, कंदलगाव यासह शहरालगतच्या उपनगरांमध्ये संजय वास्कर यांना मानणारे अनेक कार्यकर्ते आहेत. वास्कर यांनी थेट अमल महाडिक यांना पाठिंबा जाहीर केल्याने, महाडिक यांचा विजय सुकर बनला आहे. संजय वास्कर, मनिषा वास्कर यांच्यासह चार सदस्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह या निवडणुकीत अमल महाडिक यांच्यासाठी काम करणार असल्याचे जाहीर केले. आमदार ऋतुराज पाटील यांच्या निष्क्रियतेला कंटाळून आपण आम्हाला महाडिक यांना पाठिंबा देत असल्याचे संजय वास्कर यांनी सांगितले.  यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी वास्कर दांपत्याचे स्वागत करून, आगामी काळात जिल्हयातील भाजपा अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच सतेज पाटील यांच्या नेतृत्वाबद्दल आणि  विद्वेषी राजकारणाबद्दल त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे सांगितले. त्यामुळेच काँगे्रसच्या २६ नगरसेवकांनी थेट सतेज पाटील यांच्या उमेदवार निवडीवर आक्षेप घेतला. तर काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांनीही त्यांच्यापासून फारकत घेतली. सतेज पाटील यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली असून, या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, अशी टीकाही खासदार महाडिक यांनी केली. यावेळी माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील , विलास वास्कर, उज्वला मोरे, संभाजी मोरे, सायली गाठे,  महेश पाटील, अमर कारंडे, सुरज नाईक, अनिल मोरे, योगेश कटके, संग्रामसिंह निकम, ॠषिकेश नाटेकर, अभिजीत भोसले, संदीप बाजारी  यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#Political#social media
Next Article