For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | कोल्हापूर हादरले! मध्यरात्री चप्पल लाईनमध्ये भीषण आग; लाखो रुपयांचा माल खाक

11:07 AM May 06, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कोल्हापूर हादरले  मध्यरात्री चप्पल लाईनमध्ये भीषण आग  लाखो रुपयांचा माल खाक
Advertisement

                     शिवाजी चौकात अग्नितांडव

Advertisement

कोल्हापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पश्चिमेला चप्पललाईनमधील दुकानाला शॉर्टसर्किटने मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे परिसरातील वीजपुरवठा खंडीत केला होता. येथील छत्रपती शिवाजी चौक परिसरातील चप्पल लाईनमध्ये मंगळवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास एका चप्पल दुकानाला भीषण आग लागल्याची - घटना घडली.

या आगीत दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दुकानात अचानक लागलेल्या आगीमुळे काही क्षणांतच परिसरात धुराचे लोट पसरले. दुकानात मोठ्या प्रमाणावर चप्पल आणि इतर ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने झपाट्याने उग्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत होत्या.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक जवानांनी पाण्याचे फवारे मारत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुमारे एक तासाहून अधिक काळ चाललेल्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

Advertisement
Tags :

.