देवेंद्र फडणवीस यांना कोल्हापुराचे दुकानदार देणार खास जॅकेट भेट
01:12 PM Dec 05, 2024 IST | Pooja Marathe
Advertisement
कोल्हापूरः
Advertisement
आज सायंकाळी देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
तत्पूर्वी कोल्हापुरातील एका दुकानादारांकडून देवेंद्र फडणवीस यांना खास जॅकेट बनविण्यात आलंय. देवेंद्र फडणवीस यांना खास भेट म्हणून त्यांनी एका रात्रीत जॅकेट बनवून घेतलं असून ते त्यांना जॅकेट पाठवणार आहेत. विशेष म्हणजे भगव्या रंगामध्ये तयार केलेले जॅकेट आणि त्यावर भाजपच्या कमळाचे सुद्धा डिझाईन बनविण्यात आले आहे. फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत खास कोल्हापुरातून बनवून पाठवलेले जॅकेट घालावे अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केलीये.
Advertisement
Advertisement