Kolhapur crime | कोल्हापूर हादरले: पतीच्या मित्रानेच डॉक्टर महिलेवर केला अत्याचार; व्हिडीओ काढून मागितली खंडणी
कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर अत्याचार
कोल्हापूर -घरात एकटी असतानाचा फायदा घेत डॉक्टर महिलेवर तरुणाने जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पतीला भेटण्याच्या बहाण्याने आलेल्या या तरुणाने महिलेच्या अत्याचाराचे मोबाईलवर चित्रीकरण करून हा व्हिडीओ डिलिट करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. याबाबत राजारामपुरी पोलीसठाण्यात पीडितेने फिर्याद दिली असून तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीसांनी संशयीत शक्ती विक्रम भोसले (वय २८ रा. शाहूपुरी, कोल्हापूर) यास अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित डॉक्टर महिला ३० एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता घरात एकटीच होती. त्यावेळी पतीच्या ओळखीचा असलेला शक्ती भोसले घरातराजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलसंशयिताची पतीसह ठार मारण्याची धमकी आला.
पतीशी फोनवर बोलणे झाले आहे. अर्ध्या तासात ते येणार आहेत. असे म्हणून शक्ती भोसले त्यांची वाट पहात घरातच बसला. दहा ते पंधरा मिनिटानंतर भोसलेयाने एकटेपणचा फायदा घेत पीडितेंवर जबरदस्तीने अत्याचार केला. याबाबत कोणाला काही सांगितले तर पतीसह ठार मारण्याची धमकी दिली.
धक्का घडलेल्या या प्रकाराने पीडित महिलेस जबरदस्त बसला होता. १ मे रोजी रात्री भोसले याने पीडित महिलेच्या मोबाईलवर अत्याचाराचा त व्हिडीओ पाठवला. व्हिडीओ पाहून महिलेस धक्का बसला. त्यानंतर भोसले याने फोन करून पीडित महिलेकडे हा व्हीडीओ डिलिट करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. पीडित डॉक्टर महिलेने याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आसून पोलिसांनी संशयित शक्ती भोसले याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलिसांनी सांगितले.