For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Rajesh Kshirsagar Viral Video मोठ्या नेत्याला मुलाच्या प्रकरणात ब्लॅकमेल केलं" आ. क्षीरसागरांनी उल्लेख केलेला नेता कोण?

03:20 PM Jun 28, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
rajesh kshirsagar viral video मोठ्या नेत्याला मुलाच्या प्रकरणात ब्लॅकमेल केलं  आ  क्षीरसागरांनी उल्लेख केलेला नेता कोण
Advertisement

कोल्हापूरसह राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा एक व्हिडिओ काल  (27 जून) रोजी व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश क्षीरसागर हे कंत्राटदाराशी टक्केवारीबद्दल चर्चा करताना दिसत आहे.

Advertisement

कामातील टक्केवारीवरुन कंत्राटदाराचे आमदार क्षीरसागर यांच्याशी मतभेद झाल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसते. संबंधित व्हिडिओचा आधार घेत  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आमदार क्षीरसागर यांच्यावर पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केला.

आमदार क्षीरसागरांची  प्रत्युत्तरादाखल पत्रकार परिषद

Advertisement

टक्केवारीची चर्चा करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होताच राज्यभरात मोठी खळबळ उडाली. अनेक वरिष्ठ नेत्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत टीका केली. आमदार राजेश क्षीरसागर यांनी या आरोपांवर उत्तर देण्यासाठी आज कोल्हापूरात पत्रकार परिषद घेतली. आपल्यावरच्या आरोपांना उत्तर देताना क्षीरसागर म्हणाले. मी ही पत्रकार परिषद कुठल्या ब्लॅकमेलरसाठी घेतलेली नाही. विधानपरिषदेचे काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी आपण खुलासा करावा असे सांगितल्याने मी बोलत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूराचे माजी जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी या व्हायरल व्हिडिओचा मुद्दा मांडला होता. त्यावर बोलताना आमदार क्षीरसागर इंगवले यांचं नाव न घेता ब्लॅकमेलर असा उल्लेख करत म्हणाले, "काही दिवसांपूर्वी या ब्लॅकमेलरने एका मोठ्या नेत्याच्या  मुलाचे प्रेमाच्या व्हिडिओबाबत ब्लॅकमेल केलं होतं" क्षीरसागर यांनी उल्लेख केलेला तो मोठा नेता कोण? याची चर्चा सध्या कोल्हापूरात होताना दिसत आहे.

सतेज पाटील यांच्यावरही टीका

सतेज पाटील यांचेही काही व्हिडिओ आमच्याकडे येत असतात पण आम्ही सभ्य राजकारण करतो असे राजेश क्षीरसागर यांनी म्हटले. क्षीरसागर यांच्या बोलण्यातून व्हायरल व्हिडिओमागे आमदार सतेज पाटील यांचा हात असल्याचे संकेत दिसत होते. 

Advertisement
Tags :

.