कोल्हापूरच्या अधिवेशनात शिवसेनेकडून सहा ठराव मंजूर ! कोणते सहा ठराव नक्की वाचा.
शिवसेनेचा राष्ट्रीय अधिवेशनात आज पहिल्याच दिवशी सहा ठराव मंजूर करण्यात आले. या सहा ठरावांपैकी चार ठराव हे अभिनंदन ठरावाचे असून शिवसेनेने पुढील वर्षापासून जुन्या आणि कट्टर शिवसैनिकांच्या स्मृती पित्यर्थ पुरस्कार वितरणाची ठराव मंजूर करण्यात आला. या संबंधीची माहिती शिवसेना प्रवक्ते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिवेशनाच्या ठिकाणी दिली.
शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन आज कोल्हापुरात सुरू होत असून या अधिवेशनाला राज्यभरासह देशभरातील अनेक राज्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली आहे. कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये घेण्यात चालू असलेल्या या अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख एकनाथजी शिंदे हे स्वतः हजर आहेत.
तत्पूर्वी, आज सकाळच्या सत्रामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहा ठराव मंजूर करण्यात आले आहेत. या सहा ठरावापैकी चार ठराव हे अभिनंदनच ठरावाचे आहेत.
मंजूर केलेल्या ठरावा पैकी पहिला ठराव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनचा ठराव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्येमध्ये राम मंदिर उभारल्याने त्यासाठी त्यांचे अभिनंदन झालं पाहिजे यासाठीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
दोन नंबरचा ठराव सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनचाच असून सलग दहा वर्षे देशाचा कारभार सांभाळल्याबद्दल त्यांचे शिवसेनेकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
तिसरा ठराव हा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशाला देशाची सुरक्षितता सक्षम केल्याबद्दल चा अभिनंदन चा ठराव करण्यात आला.
पाचवा ठराव हा दिशा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनचा ठराव असून महाराष्ट्रातील जनतेला आणि गोरगरीब नागरिकांना सोयी सुविधा पुरवल्याबद्दल त्यांचा या ठरावाद्वारे सन्मान करण्यात आला.
पाचवा ठराव हा पुरस्काराच्या मंजुरी संदर्भातला असून शिवसेनेचे जुने नेते आणि कार्यकर्ते यांच्या स्मृती प्रत्यर्थ या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाला टोला हाणताना उदय सामंत म्हणाले, काही लोकांना जुन्या शिवसैनिकांचा विसर पडलेला आहे. त्यामुळे शिवसेना त्यामुळे शिवसेनेने यावर्षीपासून पुरस्काराच्या घोषणा केलेल्या आहेत. असं म्हटलं आहे.
शिवसेने तर्फे देण्यात येणारे पुरस्कार पुढीलप्रमाणे
- दत्ताजी साळवी उत्कृष्ट कामगार पुरस्कार
- सुधीर जोशी उद्योजकता पुरस्कार
- दत्ताजी नलावडेआदर्श शिवसैनिक
- प्रमोद नवलकर उत्कृष्ट पत्रकार
- वामनराव महाडिक शैक्षणिक पुरस्कार
- दादा कोंडके कला पुरस्कार