महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मोठा अपघात! अकिवाट- बस्तवाड दरम्यान महापुरात ट्रॅक्टर पलटी ! तिघेजण बेपत्ता; चौघे सुखरूप एकजण गंभीर

12:33 PM Aug 02, 2024 IST | Abhijeet Khandekar
Kolhapur Shirol accident Akiwat- Bastwad tractor overturned the flood
Advertisement

कुरुंदवाड प्रतिनिधी

सध्या कृष्णला आलेल्या महापुरामुळे शेताकडे अथवा अन्य कामाकडे जाण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो मात्र अकिवाट बस्तवाड दरम्यान पुराचे पाणी आले असताना ट्रॅक्टर मधून जात असताना ट्रॅक्टर पलटी झाला व यातील चार जण पोहत कसेबसे बाहेर आले तर तिघेजण बेपत्ता असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे आपत्ती व्यवस्थापन मार्फत तिघांचा शोध सुरू आहे.

Advertisement

याबाबत घटनास्थळ मिळालेली माहिती अशी की, अक्किवाट बस्तवाड मार्गावर सध्या कृष्णाच्या पुराचे मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे या मार्गावर वाहणाऱ्या पाण्याला प्रचंड धार असून यातून ट्रॅक्टर मधून किंवा तेथील काहीजण जात असताना ट्रॅक्टर चालकास पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर पलटी झाला या ट्रॉलीमध्ये अकिवाट येथील सात ते आठ प्रवासी प्रवास करत होते यातील चौघेजण सुखरूप पुराच्या पाण्याच्या बाहेर आले तर तिघेजण पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेल्याने बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.

Advertisement

शिरोळ तालुक्यातील अकिवाट गावच्या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याची मोटर सुरू करण्यासाठी व या परिसरात नदीकाठावर असणाऱ्या केळी बागेत कामासाठी जात असलेल्या नागरिक ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून जात असताना चालकास पाण्याच्या अंदाज न आल्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली यामधील चार जण पोहत पाण्याच्या प्रवाहाबरोबर पाण्याच्या बाहेर आले मात्र अन्य तिघांची शोध मोहीम अद्याप सुरू आहे दरम्यान या घटनेची माहिती अक्किवाट परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि नेमकी घटना काय झाले याबाबत माहिती घेण्यासाठी भगिनी मोठ्या प्रमाणात गर्दी केले होते दरम्यान पाण्याच्या प्रभावाबरोबर बेपत्ता झालेल्या तिघांचा शोध मोहीम वेगाने सुरू आहे याबाबत यातील दोघेजण सुखरूप बाहेर येत असल्याची माहिती समोर येत आहे रेस्क्यू फोर्स आपत्ती व्यवस्थापन च्या जवानामार्फत पुराचे पाणी असलेल्या या मार्गावर बेपत्ता लोकांची शोध मोहीम अत्यंत गतीने राबविण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
Akiwat- BastwadAkiwat- Bastwad tractor overturned the floodKolhapur Shirol
Next Article