For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | नात्याला काळिमा! कोल्हापुरात जन्मदात्या बापाकडूनच दोन मुलींवर अत्याचार, उचगाव परिसरात संताप

10:44 AM Jul 05, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   नात्याला काळिमा  कोल्हापुरात जन्मदात्या बापाकडूनच दोन मुलींवर अत्याचार  उचगाव परिसरात संताप
Advertisement

कोल्हापुर -जन्मदात्या बापानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत परिसरात संताप व्यक्त होत आहे. पीडित अल्पवयीन मुलींच्या आईने याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा नोंद झाला आहे. त्यानुसार, त्या नराधमाला गांधीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisement

संबंधित प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलींना संरक्षण देण्यात आले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. गांधीनगर पोलिसांनी संशयित आरोपीवर अल्पवयीन बालिकांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.नोव्हेंबर २०२५ पासून हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार सुरू होता. या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत मुलींना शिवीगाळ, मारहाण हा नराधम करत असे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून नेमके अत्याचार किती काळ सुरू होते,

तसेच या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पीडित मुलींची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून नागरिकांनीही त्यांची ओळख उघड होईल, अशी कोणतीही माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

अमानुष घटनेमुळे उचगाव परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अधिक तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कदम व पोलीस हवालदार मिनाक्षी शिंदे करत आहेत.

Advertisement
Tags :

.