लेकांच्या विरहाने अखेर माऊलीने घेतला अखेरचा श्वास! विद्युत तारेच्या स्पर्श होऊन मृत झालेल्या दोन युवकांच्या आईने सोडला प्राण
कोपर्डे तालुका शाहूवाडी येथील दुर्दैवी घटना
शाहूवाडी प्रतिनिधी
जी लेकरं आपल्या आयुष्याचा आधार होणार होती . दमून भागून आलं की लेकरं बघितलं की समाधान व्हायचं, तीच तिची राम-लक्ष्मणाची जोडी तीन जुलै रोजी महावितरणच्या गलथानपणाचा बळी ठरली. आणि विद्युत तारेचा शॉक बसून त्यांचा जागेच मृत्यू झाला. कोपर्डे येथील सुहास आणि स्वप्निल हे दोन सख्खे भाऊ मृत झाल्याचा धक्का त्याची आई नंदाताई कृष्णा पाटील वय 60 तिला बसला आणि शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
तीन जुलै रोजी शेतात कामासाठी गेलेल्या कोपर्डे येथील स्वप्नील कृष्णा पाटील व सुहास कृष्णा पाटील या दोन भावांचा विजेच्या विद्युत तारेचा शॉक बसून जागीच मृत्यू झाला होता . पोटची दोन्ही मुलं अगदी ऐन तारुण्यात आलेली, कमावती आणि आपला भविष्याचा आधार असणारी ही राम लक्ष्मणाची जोडी जागेवरच गतप्राण झाली. आणि हा धक्का आई नंदाताई वडील कृष्णा यांना जोराचाच बसला
गेले पाच दिवस तोंडात पाण्याचा थेंब नाही .वाटप डोळे लावून लेकरांच्या असणे तळमळणाऱ्या आईने देखील अखेरचा श्वास घेतला या दुर्दैवी घटनेने कोपर्डे गावात शाहुवाडी तालुक्यात हळहळ व्यक्त होऊ लागली आहे