शाहूवाडीतील कोपार्डे येथे वीजेचा शॉक लागून सख्या भावांचा मृत्यू; जिल्हाभरात हळहळ
शाहूवाडी प्रतिनिधी
कोपार्डे ता.शाहूवाडी येथील कडवी नदीजवळ असणा-या संगम शेतात रोप लावून खत व तणनाशक मारण्यास गेलेल्या सुहास कृष्णा पाटील वय-३६ व स्वप्नील कृष्णा पाटील वय-३१ या दोन्ही सख्या भावाना शेतातील अतिउच्य वीजेच्या तारेचा स्पर्श होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. त्याच्या मृत्यूने संपूर्ण कोपार्डे गावत शोककळा पसरली आहे.
पोलिस घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,सुहास व स्वप्नील दोघे भाऊ रोप आटपून दुपारी पिकांवर तणनाशख मारण्यासाठी शेताकडे गेले होते.तणनाशक मारत असताना सुहास ला वीजेच्या तारेचा जोरदार धक्का बसून तो शेतात पडला असता,दादा काय झाल असे म्हणत स्वप्नील त्यांच्याजवळ गेला असता त्याला ही वीजेचा धक्का बसून दोघे भाव शेतात पडले.यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.आपली मुले अजून घरी का आली नाहीत म्हणून त्यांचे वडिल कृष्णा पाटील तेथे गेले असता.दोन्ही मुले गतप्राण झाल्याने ते भांबवून गेले.त्यांनी आरडा ओरड केली असता.गावातील लोकांनी धाव घेऊन त्यांना आधार दिला. दोन्ही कमवती मुले काळाने हिरावून घेतल्याने वडिल हताश झाले. दरम्यान या घटनेचा पंचनामा शाहूवाडी पोलिसांनी करून दोन्ही मृतदेह शैवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रूग्णालयात रवाना करण्यात आले.रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.शौकाकूल वातावरणात दोन्ही भावावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपली दोन्ही मुले मृत्यू झाल्याची घटना आईला व सुहास च्या पत्नीस समजताच दोघींनी केलेला आक्रोश ह्मद्य पिळवटून टाकणारा ठरला. दोन्ही मुलाच्या मृत्यूने संपुर्ण पाटील कुटुंबच उद्वस्त झाले आहे.जिवंतपणी मुलांना अग्नी देण्याची वेळ वडिलांवर आली.