....नाही तर दोन दिवसात मी पाणीही सोडणार; शाहू महाराजांच्या भेटीत मनोज जरांगेंचे स्पष्टीकरण
कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती जालन्यातील मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. आंदोलन स्थळी पोहोचून त्यांनी मनोज जरांगे- पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची ही विचारपूस केली. तुम्ही आहात म्हणून मराठे आहेत असे गौरवोद्गार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी मनोज जरांगे यांच्याविषय़ी काढले आहेत. तर श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या येण्याने आंदोलनाला बळ मिळाल्याची भावनाही मनोज जरांगे- पाटील यांनी व्यक्त केले. दोन दिवसात जर सरकारने आरक्षण दिले नाही तर आपण पुन्हा पाणी पिणार नाही असेही मनोज जरांगे- पाटील यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांना सांगितले.
जालन्यातील आंतरवली सरटी येथे मनोज जरांगे- पाटील यांनी आंदोलन सुरु केले आहे. आजच्या सहाव्या दिवशी मनोज जरांगे यांची तब्येत खुपच खालावली असल्याचे समाज माध्यमांमध्ये दिसून आले. त्यामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी तणाव दिसून येत आहे. या पार्श्वभुमीवर कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती मनोज जरांजे यांच्या तब्येतीची चौकशी आणि विचारपूस करण्यासाठी जालन्याकडे आज सकाळी रवाना झाले होते.
आज दुपारी 12 वाजण्याच्य़ा सुमारास श्रीमंत शाहू छत्रपती हे जालन्यातील आंतरवली सराटी या ठिकाणी पोहोचले. आंदोलनस्थळी त्यांनी मनोज जरांगे- पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. शाहू महाराज छत्रपती आणि मनोज जरांगे यांच्यात आरक्षणावरून चर्चा झाली. दोघांमध्ये झालेल्या चर्चामध्ये श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, "आम्हाला तुमच्या प्रकृतीची काळजी आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन चालू ठेवण्यासाठी तुम्ही तब्येतीकडे लक्ष दिले पाहीजे. कारण तुम्ही आहात म्हणून मराठे आहेत. आपण सर्व मराठा एक आहोत." असे बोलून आंदोलन चालू ठेवण्यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी दोन घोट पाणी प्यावे अशी विनंती केली.
त्यावर मनोज जरांगे यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याविषयाी कृतज्ञता व्यक्त करताना आपण आलात म्हणून आंदोलनाला बळ मिळाले असल्याची भावनाही व्यक्त केली. ते म्हणाले, "आपण आलात त्यामुळे आंदोलनाला बळ मिळाले. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला अर्धवट आरक्षण देऊ नये असेही मी राज्यसरकाला सांगितले आहे. तसेच सरकारने दोन दिवसात आरक्षण नाही दिले तर मी पुन्हा पाणी पिणार नाही. पण आपण आलात त्यामुळे मी दोन दोन घोट पाणी घेतो. मी उपचार घेतले तर सरकारच्या आरक्षणासाठीच्या बैठका बंद होतील." अशा भावना मनोज जरांगे- पाटील यांनी व्यक्त केल्य़ा.
श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या सोबत गेलेल्या शिष्टमंडळात वसंतराव मुळीक, बाबा इंदूलकर, व्ही. बी. पाटील, माणिक मंडलिक, बाबा पार्टे, चंद्रकांत पाटील, सुनिता पाटील, इंद्रजीत सावंत, दिलीप देसाई , हर्षल सुर्वे, उदय लाड, अमर निंबाळकर, सतीश नलवडे, गीता हसुरकर, रूपाली बराले, गीता जगताप, राजेंद्र दळवी, मनोज जाधव, नितीन जाधव, अवधूत पाटील, शशिकांत पाटील, मनोज नरके, शुभम शिरहट्टी आंदींचा समावेश होता.