कोल्हापुरात बजरंग दलाचे जोरदार आंदोलन
दलाच्या वतीने प्रतिकात्मक औरंगजेबची कबर उध्वस्त करत आंदोलन
कोल्हापूरः
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरी वरून मोठ्या प्रमाणात वाद पेटला आहे. औरंगजेबाची कबर काढून टाकावी अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू, असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिला होता. याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात आंदोलन सुरू आहेत. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील बजरंग दलात कडून आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान आंदोलकांनी प्रतिकात्मक औरंगजेबाची कबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवण्याचा प्रयत्न हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी केला मात्र पोलिसांनी कबर असलेली गाडी पळवून लावली.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे कुंदन पाटील म्हणाले, "ज्या औरंगजेबाने हिंदू समाजावर अत्याचार केले. त्या औरंगजेबाची कबर १९०९ साली ब्रिटीश सरकार छत्रपती संभाजीनगर याठिकाणी संरक्षित केलेली आहे. त्याचा संरक्षित दर्जा हटवून ही औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या भूमीतून काढली गेली पाहीजे, यासाठी बजरंग दलाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केले जात आहे. यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. औरंगजेबाच्या कबरीवर करोडो रुपयांचा खर्च झालेला, तो थांबविला पाहीजे. यामाध्यमातून होणारे राजकारण थांबविले पाहीजे. प्रशासनाला जाग यावी यासाठी प्रतिकात्मक कबर आणली होती. या ठिकाणी पोलिसांनी ती घालू दिली नाही. जर प्रतिकात्मक कबर प्रशासनाला चालत नाही, तर औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या भूमीवर या प्रशासनाला कशी चालते", असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.