महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कासचा फुलोत्सव ५ सप्टेंबर पासून पर्यटकांसाठी खुला! कास पठार कार्यकारी समितीकडून फुलोत्सोवाची तयारी पूर्ण.

11:59 AM Sep 02, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

कास वार्ताहर

Advertisement

जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठारावरील फुलांचा फुलोउत्सव पर्यटकांसाठी ५ सप्टेंबर पासून खुला करण्यात येणार असून कास पठार कार्यकारी समितीकडून यावर्षीच्या कास हंगामाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कासा हंगाम दरवर्षी एक सप्टेंबर रोजी पर्यटकांसाठी खुला करण्यात येतो मात्र यावर्षी सततचा पडणारा पाऊस व पठार परिसरातील वातावरण पाहता चार दिवस हंगाम उशिरा सुरू करण्यात येत आहे. 5 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक अकरा वाजता लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सातारा जावलीचे कार्यसम्राट आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये यावर्षीच्या कास फुलोत्सवाचा शुभारंभ करण्यात येणार आहे यावेळी सातारा उपवनसंरक्षक यांचेसह सातारा व जावली च वनपरिक्षेत्र अधिकारी व कास पठार कार्यकारी समितीचे सर्व सदस्य व कर्मचारी देखील उपस्थित राहणार आहेत. कास पठार कार्यकारी समितीकडून पर्यटकांसाठीच्या सर्व सोयी सुविधांची तयारी करण्यात आली असून यावर्षी प्रथमच येणाऱ्या पर्यटकांच्या करिता नैसर्गिक रित्या सहा झोपड्या तयार करण्यात आले आहेत यामध्ये कुमुदिनी तलाव, भदार तळे गेट नंबर १, राजमार्ग या ठिकाणी २,कार्यालय जवळ एक,गेट नंबर ३ च्या आत एक अशा सहा झोपड्या निवाऱ्यासाठी ठीक ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत. कास हंगाम जरी पाच तारखेला अधिकृत खुला केला तरी दहा तारखे नंतर ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना ऑनलाइन ची सुविधा www.kas.ind.in या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क १५० रुपये, गाईड फी ४५ मिनिटांकरिता शंभर रुपये ( प्रति ग्रुप १० पर्यटक संख्या), उपद्रव शुल्क दोन हजार रुपये, बारा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना 40 रुपये प्रवेश शुल्क मात्र सोमवार ते शुक्रवार येणे बंधनकारक असेल तसेच संबंधित शाळा कॉलेज महाविद्यालय यांच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांचे पत्र आवश्यक असेल. हंगामा करिता सहा गावातील १३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पार्किंग ते कास पुष्प पठार यादरम्यान पर्यटकांसाठी मोफत बस सेवा पुरविली जाणार आहे तसेच पार्किंग मध्ये सहा शौचालयांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे तसेच ठीक ठिकाणी पिण्यासाठी मिनरल वॉटर चे पाणी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कास पुष्प पठारावर सद्यस्थितीमध्ये चवर,टोपली कारवी, दिपकांडी,आभाळी, सीतेची आसवे, सोनकी,तेरडा, भारांगी,धनगरी फेटा,तुतारी,कुमुदिनी यासह अनेक प्रकारची फुले उमलेली असून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये नैसर्गिक मध्ये ज्या प्रकारे बदल होतात त्याप्रमाणे इतर देखील फुले पर्यटकांना वेगवेगळ्या टप्प्यात पाहता येणार आहेत त्यामुळे यावर्षींच्या कासच्या फुलोत्सवाची परवणी आता पर्यटकांसाठी खुली होणार आहे.

Advertisement

कास पुष्प पठारावर प्रथमच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच.

कास पुष्प पठारावर यावर्षी प्रथमच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवण्यात येणार असून कास पठार कार्यकारी समितीचे कार्यालय तसेच राजमार्ग यास अन्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे हंगामापूर्वी बसविण्यात येणार आहेत त्यामुळे पठारावर उपद्रव करणाऱ्या व धांगडधिंगा करणाऱ्या पर्यटकांवर देखील सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर असणार आहे.

मद्यपान करणाऱ्यांवर देखील बसणार वचक.

कास पुष्प पठारावर सर्व स्तरातील पर्यटक हे फुले पाहण्यासाठी येत असतात काही पर्यटक हे पठारावर मद्यपान देखील करून येत असतात त्यामुळे अशा पर्यटकांवर वचक बसण्यासाठी समितीच्या माध्यमातून मध्यमान मद्यपान मशीन खरेदी करण्यात येणार असून कोणते पर्यटक पठारावर मद्यपान करून आलेले आहेत हे देखील आता समजणार आहे.

Advertisement
Tags :
Kolhapur satara kaas platue tarun bharat news
Next Article