For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूरकर डेंग्यूच्या रडारवर

10:58 AM May 16, 2025 IST | Radhika Patil
कोल्हापूरकर डेंग्यूच्या रडारवर
Advertisement

कोल्हापूर / इंद्रजित गडकरी :

Advertisement

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त कोल्हापूर जिह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला असता, ग्रामीण व शहरी भागात डेंग्यू किंवा डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांची संख्या चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. ऋतू संक्रमणाच्या काळात अनेक घरांमध्ये व्हायरल तापाचे रुग्ण असून, सामान्य तापाच्या प्रत्येक पाच रुग्णांपैकी एक रुग्ण डेंग्यूसदृश असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले आहे.

महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाय योजनांची घोषणा केली जात असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक त्रुटी जाणवतात.

Advertisement

  • हवामानातील बदल डासांना पोषक

पावसाळ्यानंतर उष्णता आणि थंडी यांचे मिश्र वातावरण निर्माण होते, जे एडीस डासांच्या वाढीस अनुकूल ठरते. गोड्या पाण्यात अंडी घालणारा हा डास घरात व घराभोवती सहजपणे वाढतो.

  • ग्रामीण भागही डेंग्यूच्या विळख्यात

शहरी भागात डेंग्यूचे प्रमाण अधिक असले तरी ग्रामीण भागातही डेंग्यूने उचल खाल्ली आहे. दूषित पाण्यामुळे उद्भवणारे आजार आणि आरोग्य सेवांची अपुरी उपलब्धता यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. ग्रामपंचायतींनी तातडीने डास निर्मूलन मोहिमेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

  • महापालिकेचे सर्वेक्षण अपुरे

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या ‘घर टू घर‘ सर्वेक्षणात केवळ उपस्थिती दर्शवली जात असून, प्रत्यक्षात रुग्ण तपासणी, माहिती संकलन, प्रबोधन याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मोहिमेचा प्रत्यक्ष उपयोग नगण्य ठरत आहे.

  • डेंग्यूची लक्षणे ओळखा

जोरदार ताप येणे डोक्याच्या पुढील भागात तीव्र वेदना

डोळ्यांच्या मागे वेदना (डोळ्यांची हालचाल करताना वाढते)

स्नायू व सांध्यांत वेदना

चव व भूक नष्ट होणे

मळमळ, उलट्या

छाती व वरील भागावर पुरळ

तज्ञांच्या मते डेंग्यूवर थेट औषध उपलब्ध नसल्याने प्रतिबंध हाच एकमेव प्रभावी उपाय आहे.

  • घराभोवतीच डेंग्यूचा स्रोत

एडीस इजिप्ती‘ या डासामुळे डेंग्यूचा फैलाव होतो. फक्त पाच दिवसांपेक्षा अधिक काळ साचलेल्या अगदी थोड्या पाण्यातही अळ्या तयार होतात. डास दिवसा चावतो व प्रामुख्याने घराच्या आत व आजूबाजूच्या परिसरात आढळतो. त्यामुळे घरातील पाणी साठवण व पावसाचे साचलेले पाणी त्वरित हटवणे आवश्यक आहे.

  • आर्थिक फटका सामान्य कुटुंबांवर

डेंग्यूमुळे सामान्य उत्पन्न असण्राया कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडते. एका रुग्णाच्या उपचारांसाठी किमान ऊपये 50,000 खर्च येतो. आजारानंतर दीर्घकाळ अशक्तपणा, उत्साहात घट अशा समस्या भेडसावत असल्याने क्रयशक्ती व कार्यक्षमता कमी होते.

  • एकत्रित प्रयत्नांची गरज

डेंग्यू नियंत्रणासाठी प्रशासन, स्थानिक संस्था आणि नागरिक यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक आहेत. महापालिकेने प्रभावी जनजागृती मोहीम राबवावी, तर ग्रामपंचायतींनी डास नियंत्रणासाठी तातडीची पावले उचलावीत. नागरिकांनी स्वच्छता राखून आपल्या परीने डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यास मदत करावी.

  • जिल्हयातील मागील तीन वर्षाची आकडेवारी

वर्ष                              तपासलेले रक्ताचे नमूने                                 आढळून आलेले ऊग्ण

2022                                      2187                                                                 877

2023                                      4499                                                                 861

2024                                     8059                                                                1243

2025                                    997                                                                    61

(एप्रिल अखेर)

Advertisement
Tags :

.