कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापूरकरांना महापुराची धास्ती

01:34 PM Jul 26, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

चालु वर्षी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यातच मान्सूनही जोरदार बरसला असुन आज पर्यंत सरासरी 3046 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सध्याचा धरणसाठा आणि हवामान खात्याचा अंदाज पाहता 2021 च्या पुराच्या आठवणीने कोल्हापूरकरांच्या मनात धडकी भरली आहे. त्यावेळी 2876 मिलीमीटर पाऊस झाला होता. मात्र, धरणातील पाणीसाठा कमी होता. त्यामुळे यंदा 2021 पेक्षाही अधिक महापुराची धास्ती कोल्हापूरकरांच्या मनात भरली आहे.

Advertisement

पावसाळा सुरू झाला की, कोल्हापूरकरांबरोबरच नदीकाठच्या लोकांना मनात भितीचे काहुर माजते. दरवर्षी जून - जुलै महिन्यात पावसाची उघडझाप असते. पण, यंदा वरुणराजाने मे महिन्यापासुनच धुमाकुळ घातला आहे. आजपर्यंत झालेला पाऊस हा मागील तीन वर्षांपेक्षा तिप्पट पाऊस आहे. 2021 मध्ये असाच पाऊस झाला होता. व जुलैच्या शेवटच्या आठवड्यात महापुराने हाहाकार माजला होता. आज घडीला जिल्हातील धरण साठा त्यापेक्षा दुप्पट असल्याने कोल्हापूरकरांच्या मनात धास्ती भरली आहे.

सध्या पडणारा संभाव्य पाऊस याचा ताळमेळ घालून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. पाटबंधारे विभागाने आतापासूनच विसर्ग सुरू केला असला, तरी आगामी काळ कसोटीचा राहणार आहे. यंदाही 2019 आणि 2021 प्रमाणे महापूर आलाच तर जिह्यातील 345 गावे धोक्यात येणार आहे. दोन्ही महापुरात ही गावे बाधीत झाली होती. या गावांना महापुरापासून वाचवण्यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना सरकारी पातळीवर झाल्या नाहीत. नुकसानग्रस्तांना भरपाईही मिळाली तीही तोकडी होती. पुन्हा तसाच महापूर आला तर काय? ही चिंता येथील ग्रामस्थांना सतावत आहे.

महापुरात आठ दिवस शहरासह जिह्यातील 318 गावांचा संपर्क तुटतो. पिकासह मालमत्तेचं हजारो कोटींचे नुकसान होते. सर्व 12 तालुके कमी अधिक प्रमाणात महापुराने बाधीत होतात. नदी काठांवरील गावांना महापुराने तर अतिवृष्टीने डोंगराळ तालुक्यातील गावांना फटका बसत असल्याचा अनुभव आहे. जमीन खचल्याने डोंगरांलगतच्या वाड्यांना धोका निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत. धोकादायक अशी 17 छोटी गावे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे नियोजन प्रशासनाने केले. मात्र, ते अद्याप कागदावरच राहिले आहे. ठोस पाठपुरावा न झाल्याने राज्य सरकारच्या तुटपुंज्या मदतीवरच समाधान मानावे लागले.

दोन महापूर आणि अतिवृष्टीमुळे 9 हजार 542 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. तब्बल 31 हजार 492 घरे अंशत: पडली होती. ही सर्व घरे पुन्हा जशीच्या तशी उभारली गेली नाहीत. सरकारकडून भरपाईचे पैसे कमी मिळाल्याने संबंधीतांना पडक्या घरांतच दिवस काढावे लागत आहे. वाहून गेलेले रस्ते तात्पुरत्या स्वरूपात दुरूस्त करण्यात आले. दुरुस्तीचा आराखडा निधीअभावी लालफितीमध्येच अडकला. हवामान विभागाने यंदाही चांगल्या पावसाचा अंदाज सांगितला. किंबहुना तसा पाऊस पडतही आहे. यामुळे महापुरात फटका बसलेल्या गावांना आतापासूनच धडकी भरत आहे. ठोस कृती कार्यक्रम आणि पाठपुराव्याबाबत महापुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या गप्पा मारत माध्यमातून झळकण्यात धन्यता मानली जात आहे. महापूर आल्यानंतर आणि गेल्यानंतर राजकारण सुरू होईल. घोषणांचा पाऊस पडेल. यापूर्वी केलेल्या कामांची यादी सांगत चुकांवर पांघरुन घालण्याचाही प्रयत्न होईल. प्रशासनाचा वेळ काढूपणा आणि लोकप्रतिनिधींची चालढकल भूमीका कोल्हापूरकरांना महापूराची भितीच्या छायेत राहण्यास भाग पाडत असल्याचे दुर्दैवी वास्तव मान्य करावे लागेल.

पाचगाव, मोरेवाडी, कळंबा, आर. के. नगर, मंडलिक पार्क, साईक्स एक्स्टेन्शन, रेल्वे स्टेशन, शिवाजी पार्क, सी वॉर्ड, लक्ष्मीपूरी, कनाननगर, ताराबाई गार्डन, शाहुपूरी, राजारामपूरी, शिवाजी उद्यमनगर, वाय. पी. पोवार नगर, यादव नगर, प्रतिभा नगर, जवाहरनगर, सुभाषनगर, न्यू शाहूपूरी, गुलाबनगर, रायगड कॉलनी, रामानंद नगर, हॉकी स्टेडियम, रंकाळ्याच्या परताळा परिसर आदी शहराच्या मध्यवस्तीतून जयंती नाला वाहतो. शिवाय लहान मोठ्या नाल्याचे जाळेच शहरात आहे. या नाल्याभोवतालच्या परिसरात वसलेल्या 40 हून कॉलन्या पावसाच्या पाण्याच्या धोका आहे. हलक्या पावसातही या कॉलन्यात पाणी साचत आहे.

आठ लाख लोक महापुराने बाधित.

318 गावांचा संपर्क तुटतो.

9 हजार 542 घरे पूर्णपणे जमीनदोस्त.

31 हजार 492 घरांची पडझड.

17 गावात भूस्सखलनचा धोका

2019 ला 78 हजार 227 हेक्टर पिकाचे नुकसान

2021 ला 70 हजार 145 हेक्टर पिकाचे नुकसान

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article