For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Weather Alert: कोल्हापूरकरांनो काळजी घ्या! बुधवारी धुवांधार पाऊस, गुरुवारीही मुसळधारेचा इशारा

11:02 AM Jul 02, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur weather alert  कोल्हापूरकरांनो काळजी घ्या  बुधवारी धुवांधार पाऊस  गुरुवारीही मुसळधारेचा इशारा
Advertisement

कोल्हापूर -जिल्हयात शहर आणि परिसरासह बुधवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. नव्या पर्जन्यवर्षात आतापर्यंत ११७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

Advertisement

जिल्ह्यात हवामान विभागाने गुरुवारीही ऑरेंज अलर्ट दिला आहे. बुधवारी जिल्ह्यात पावसाने दमदाररात्री उशिरापर्यंत पावसाच्या जोरदार सरी, जनजीवन विस्कळीतहजेरी लावल्याने खरीप पेरणीच्या कामात अडथळे आल्याचे चित्र पहायला मिळाले. दरम्यान, पावसामुळे जिल्हयातील नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात जूनच्या अखेरीस पावसाला सुरूवात झाली.

पण जूनमध्ये सुमारे ३ आठवडे पावसाचा मागमुसही नव्हता. पण अखेरच्या दोन दिवसांत पावसाने चांगली हजेरी लावल्याने खरीप पेरण्यांसाठी पूरक वातावरण तयार झाले. बुधवारीही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिली. सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले.१ जूनपासून आजपर्यंत ११९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.