For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेंदाळ ग्रामपंचायत कारभारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधील वाद विकोपाला! गुन्हा दाखल करण्याची मागणी

11:46 AM Feb 09, 2024 IST | Abhijeet Khandekar
रेंदाळ ग्रामपंचायत कारभारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधील वाद विकोपाला  गुन्हा दाखल करण्याची मागणी
Kolhapur Rendal GramPanchayat
Advertisement

हुपरी वार्ताहर

हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ ग्रामपंचायत या त्या कारणाने प्रसिद्ध झोतात येत आहे. ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी आणि विकास कामाची आवड असणारे सामाजिक कार्यकर्ते यांच्यात समोरासमोर बसून समझोता न झाल्याने यांच्यातील तात्विक वाद विकोपाला पोहचला आहे.एकमेकांच्या विरोधात गावातील वातावरण बिघडेल आशा प्रकारचे निवेदने जिल्हा पोलीस प्रमुख ,स्थानिक पोलीस ठाणे यांच्याकडे दाखल केल्याने वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.एकेकाळी नावारूपाला आलेल्या गावाची बदनामी होऊ नये याकरिता गावातील ज्येष्ठ, वरिष्ठ लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून तोडगा काढणे गरजेचे आहे.

Advertisement

गावच्या लोकनियुक्त सरपंच यांनी एक वर्षे झाले काही व्यक्ती मला मानसिक त्रास देणे , खंडणी मागणे असे प्रकार करीत असल्याने त्या चार जणांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी असे लेखी निवेदन दिले आहे. तर गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी शासकीय नियमानुसार ग्रामपंचायत मासिक मिटींगला बसण्यासाठी नागरिकांना खुल्ले करावे असे म्हणताच दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी, जातीवाचक शिवीगाळ देत असल्याने आजी माजी सरपंच , सरपंच पती, विद्यमान सदस्य, समर्थक आशा१५जणांवर कायदेशीर गुन्हे दाखल करावे असे लेखी निवेदन दिले आहे. हे गंभीर स्वरूपाचे निवेदन असून गावात खळबळ उडाली आहे. यावर विचारपूर्वक तोडगा काढून वेगळ्या वळणावर जाणारे गाव थांबविणे गरजेचे आहे.

गावात कोणत्याही प्रकारचा विकास करीत असताना अथवा शासकीय अथवा कोणतीही योजना राबवित असताना एकी कशी असावी याचे उदाहरण म्हणजे रेंदाळ या एकमेव गावाचा उल्लेख केला जातो. असे आदर्शवादी गाव दुसऱ्या वळणावर जात असताना ज्येष्ठ आणि वरिष्ठ लोकप्रतिनिधीनी लक्ष घालणे गरजेचे आहे.गावातील अनेक विचारवंत मान्यवरांनी काही वर्षांपूर्वी जलस्वराज्य प्रकल्पअंतर्गत पाणी योजना राबवून एकीचे दर्शन घडविले आहे.शासकीय अधिकारी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना रेंदाळ गावचे उदाहरण देत होते. त्याकाळी सर्व पक्षाचे ,गटाचे नेतेमंडळी गावातील मोठया संख्येने महिला, नागरिक एकत्रित येऊन योजना यशस्वीपणे राबवून जागतिक पटलावर आदर्शवादी गाव म्हणून नावलौकिक केले होते.आशा गावाची बदनामी होऊ नये याकरिता गावातील ज्येष्ठ, विचारवंत मान्यवर, वरिष्ठ लोकप्रतिनिधी,संबंधित शासकीय, प्रशासकीय अधिकारी यांनी लक्ष घालून हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न करावा अशी चर्चा सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.