लाचखोरीत कोल्हापूर राज्यात नवव्या स्थानावर
कोल्हापूर / संतोष पाटील :
राज्यात भ्रष्टाचाराची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असतानाच, राज्यात पुणे जिल्हा लाचखोरीत वर्षभरातील 55 प्रकरणांमुळे अव्वल ठरला आहे. दुस्रया स्थानावर ठाणे 50 तर संभाजीनगर 41 प्रकरणासह तिस्रया स्थानावर आहे. राज्यातील 36 जिह्यात कोल्हापूर मात्र नवव्या स्थानावर आहे. मागील वर्षी 14 व्या स्थानावर असलेल्या कोल्हापूरने मागील वर्षी इतकीच 26 प्रकरणच दाखल झाली आहेत. राज्यात वर्षभरात 665 लाचखोरी, सात प्रकरणे असंपदा इतर भ्रष्टाचाराचे एक प्रकरण घडले. मागील वर्षीच्या तुलनेत 116 सापळे कमी झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावरून ही माहिती समोर आली आहे.
नाशिक विभाग सलग दुस्रया वर्षीही भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. दुस्रया स्थानावर पुणे विभाग असून, तिस्रया स्थानावर छत्रपती संभाजीनगर आहे. राज्यात यावर्षी 701 कारवाया करण्यात आल्या. त्यात 1062 लाचखोर अधिकारी, कर्मच्रायांना अटक झाली. राज्यात शिपायापासून ते वर्ग एकच्या अधिक्रायांपर्यंत लाच घेण्रायांची संख्या वाढली आहे. महसूल विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, समाजकल्याण विभाग, महापालिका, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी लागण्राया उत्पन्नाच्या दाखल्यापासून ते मृत्यू प्रमाणपत्रापर्यंत लाच दिल्याशिवाय काम होत नसल्याचे चित्र आहे.
राज्यात मालमत्ता गोठवण्यासाठी 14 प्रलंबित प्रकरणे आहेत. नगरविकास पाच प्रकरणे ( 3 कोटी 82 लाख 72 हजार 797), ग्रामविकास दोन प्रकरणात (एक कोटी 60 लाख 18 हजार 522), पोलीस दोन प्रकरण ( दोन कोटी 39 लाख 58 हजार 104), परिवहन एक (47 लाख 69 हजार 774), कृषी एका प्रकरण (12 लाख 77 हजार 267) जलसंपदा एक प्रकरण ( दोन कोटी 82 लाख 52 हजार), पीडब्ल्युडी एक प्रकरण (दोन कोटी 48 लाख 81 हजार 469) आणि आदिवासी विभागातील एका प्रकरणात (दोन कोटी 60 लाख 70 हजार 363) अशी एकूण 14 प्रकरणातील 16 कोटी 35 लाख 296 रुपयांची मालमत्ता गोठवण्याचे प्रस्ताव यंदाच्या वर्षी पाठवण्यात आले. लाचखोरीच्या तक्रारीनंतर सापळा रचून कारवाई झाल्याचे प्रकरणांची संख्या वाढत असली तरी त्यानंतरची कायदेशीर कारवाई किचकट आणि वेळखाऊ असल्याचे आकडेवारी सांगते. जानेवारी 2024 ते आजअखेर दोषसिध्द आरोपींची संख्या फक्त 29 इतकीच आहे. दोषसिध्द गुह्यातील दंडाची रक्कम फक्त आठ लाख 14 हजार इतकी आहे. यंदाच्या वर्षभरातील 665 प्रकरणातील 702 गुह्यात फक्त 144 दोषारोप पत्र दाखल केले आहेत. 466 प्रकरणे तपासावर प्रलंबित आहेत.
विभागवार अशी झाली लाचखोरी
नाशिक विभागात 147 कारवायांमध्ये 226 लाचखोरांना पोलिसांनी अटक केली. दुस्रया स्थानावर असलेल्या पुण्यात 143 कारवाया झाल्या. यात 215 अधिकारी आणि कर्मच्रायांना लाच घेताना अटक करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरात 112 कारवायांमध्ये 180 लाचखोर तर ठाण्यात 70 कारवायांमध्ये 108 लाचखोरांना अटक करण्यात आली. लाचखोरीत नागपूरचा सहावा क्रमांक असून, 62 कारवायांमध्ये 92 लाचखोरांना अटक करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून लाचखोरीत महसूल विभाग आणि पोलीस विभाग अव्वल स्थानावर कायम आहेत. महसूल विभागात 176 कारवायांमध्ये 246 लाचखोरांना अटक करण्यात आली. यात 150 कर्मचारी आहेत. पोलीस विभागात 133 कारवाया झाल्या. यात 195 लाचखोरांचा समावेश असून त्यातही 12 ‘क्लास वन‘ अधिकारी आहेत.