For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : केंद्राच्या क्षयरोग निर्देशांकामध्ये राज्यात कोल्हापूर प्रथम

06:05 PM Jan 20, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   केंद्राच्या क्षयरोग निर्देशांकामध्ये राज्यात कोल्हापूर प्रथम
Advertisement

                                कोल्हापूर जिल्हा टीबी प्रतिबंधात राज्यात प्रथम

Advertisement

कोल्हापूर : हे यश संपादन करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन एस., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रशांत वाडीकर आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. डॉ.हर्षला वेदक यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे हे यश साध्य झाले आहे असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले.

तसेच त्यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमामधील केंद्र सरकारच्या निर्देशांकाच्या वाढीसाठी व क्षयरुग्ण सेवेसाठी अहोरात्र काम केलेल्या सर्व अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, खासगी संस्था, पी.पी.एस.ए.यांचे अभिनंदन केले. जिल्हयात क्षयरोगाचे निदानासाठी २० - दूनेंट, ४-सी.बी. नॅट, २४-एक्स-रे, ९८ मायक्रोस्कोपी सेंटर्स आहेत. निदान झालेल्या क्षयरुग्णास सर्व शासकीय आरोग्य संस्थेतून किंवारुग्णास त्यांच्या घराजवळील सोयीच्या आरोग्य संस्थेमध्ये उपचार दिला जातो.

Advertisement

क्षयरोग औषधोपचार शासनामार्फत मोफत केला जातो. कोल्हापूर ग्रामीण मध्ये दरवर्षी शासकीय व खासगी क्षेत्रातील मिळून सरासरी २५०० ते २७०० टी.बी. रुग्णांचे निदान होते. सन २०२५ मध्ये ६ लाख ४० हजार ७४६ लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले. त्यापैकी १ लाख केंद्र सरकारकडून यांची तपासणीक्षयरुग्णांचे निदान साध्य दर, एचआयव्हीची तापसणी, नॅट तपासणी, उपचार यशस्वीता दर, निक्षय पोषण योजनेचा लाभ, अतिजोखमग्रस्त (एम.डी.आर.) क्षयरुग्णांवरील उपचार दर व संपर्कातील पाच वर्षाखालील मुलास क्षयरोग प्रतिबंधामात्मक उपचार दिलेला दर या निर्देशांकांनुसार मूल्यमापन करून रेकिंगनुसार कोल्हापूर जिल्हयाने ९२.४० टक्के कामकाज करून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

४१ हजार ६६९ संशयितांची एक्सरे तपासणी केली आहे व ४२ हजार ६१८ संशयितांची नॅट तपासणी केली आहे. या तपासणीमधून २४५१ इतके रुग्णांचे निदान झाले आहे. या अभियानामध्ये निक्षय मित्रांनी केलेल्या सहकार्यामुळे कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम आला आहे. सन २०२४ मध्ये पडताळणीनंतर ३५९ ग्रामपंचायती टीबी मुक्त ग्रामपंचायती म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ५० रौप्य व ३०९ कास्य प्रमाणपत्र प्राप्त ग्रामपंचायतीं आहेत. यामध्ये सन २०२५ मध्ये सुमारे ६६७ ग्रामपंचायती नामांकन करण्यासाठी पात्र झाल्या आहेत. यामध्ये सुमारे ४० ग्रामपंचायती सुवर्ण प्रमाणपत्राच्या नामांकनासाठी पात्र झाल्या आहेत.

Advertisement
Tags :

.