पावसाच्या हुलकावणीने शेतीच्या मशागतीची कामे लांबली
उत्रे/ प्रतिनिधी
राज्यातील बहुतांश भागात वादळी पाऊस व गारपीट सुरू असताना पन्हाळा तालुक्यातील अनेक भागात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतीची मशागतीची कामे रखडली आहेत.
पन्हाळा तालुक्यातील अनेक गावांत शेती पाणी पुरवठा योजना आहेत. यावेळी मात्र वळीव पावसाने याभागात पाठफिरवली चे चित्र आहे. गतवर्षी ही पन्हाळा परिसरात वळीव पावसाने पाठ फिरवली होती. सध्या नदीच्या काठावर दरवर्षी येणारा पुर यामुळे ऊस पिकाऐवजी इतर उन्हाळी भात, भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका,हतीगवत,काळे गवत,गवारी, सुर्यफुल,तिळ, भेंडी,मुग,व इतर कडधान्ये आदी पिके घेतली आहेत. नदी काठी यावर्षी हुमणी मोठ्या प्रमाणात असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. एखांदा वळीव पाऊस पडतो पण यावेळी अगदी नगण्य प्रमाणात वळीव पडल्याने शेती ला पावसाची गरज आहे. तसेच ज्या ठिकाणी पाणी पुरवठा नाही तेथे मशागत ची कामे खोळंबली आहेत. यामुळे शेतकरी उन्हाळी पिके काढणे, शेती ला पाणी देणे,व खरिपाच्यामशागती तयारीत आहे.वळीव पाऊस पडल्यानंतर ही कामे लवकर होतील यामुळे शेतकरी वळीव पावसाच्या प्रतिक्षेत आहे.