राधानगरी धरण 80 टक्के भरले! पावसाचा जोर वाढल्यास या आठवड्यात धरण पूर्ण क्षमतेने भरणार
1450 क्यूसेकने विसर्ग सुरू, स्वयंचलित दरवाजाना पाणी पोहचले
राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यात धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्या पावसाचा जोर वाढला असून, तालुक्यातील तिन्ही धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राधानगरी धरण 80टक्के इतके भरले असून, पावसाचा जोर वाढल्यास या आठवड्यात धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.रविवारी दिवसभरात राधानगरी धरण क्षेत्रात73 मि मी पावसाची नोंद झाली असून, राधानगरी धरणात 80टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.म्हणजे 6661.20 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे व पाणी पातळी 337.80 इतकी आहे,
दूधगंगा धरणात 57.88 टक्के इतका पाणीसाठा असून दुधगंगा धरण परिसरात 64 मी मी पावसाची नोंद करण्यात आली आहे,तुळशी जलाशय 68टक्के भरले आहे. राधानगरी धरण परिसरात एक जूनपासून ते 21 जुलैपर्यंत 2338 मिमी पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी याच तारखेस 1619 मिमी पावसाची नोंद झाली होती. राधानगरी धरणातील वीज निर्मिती केंद्रातून 1450 क्युसेकने विसर्ग भोगावती नदीपात्रात चालू असल्याने व ओढेनाले तुडुंब वाहू लागल्याने नदीपात्रात वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे,संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे