कसबा बीड परिसरात संततदार पाऊस! महे- बीड पुलावर पाणी
नागरिकांनी पाण्यातून प्रवास न करता पर्याची मार्गाचा अवलंब करणे गरजेचे
कसबा बीड / वार्ताहर
कसबा बीड परिसरात संततधार पावसामुळे तसेच राधानगरी व तुळशी धरण यांचे पाणी तसेच ओढे व नदी नाले वोसंडून वाहत आहे . चार दिवस संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी वाढल्याने अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये कसबा बीड भागातील कोगे - बहिरेश्वर , कोगे - कुडीत्रे, या बंधाऱ्यावर अगोदच पाणी आले आहे. आज महे - कसबा बीड दरम्यान असणाऱ्या पुलावर पाणी आले आहे.
त्यामुळे कोल्हापूर ते आरळे जाणाऱ्या सर्व प्रवासी व नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे.पुलावरून पाणी वाहत असताना त्यामधून जीविताना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महे व कसबा बीड ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांना माहिती दिली आहे. त्याच बरोबर नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पुराचे पाणी वाढत असलेने सुरस्थित ठिकांणी स्थलांतरीत व्हावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.