आषाढी एकादशीला कोल्हापूर - राधानगरी रस्ता बंद
कोल्हापूर :
आषाढी एकादशीनिमीत्त प्रतीपंढरपूर नंदवाळ (ता. करवीर) येथील विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. याचसोबत संपूर्ण जिह्यातून भाविक पायी दिंडीसह पालखी सोहळ्यात सहभागी होतात. यापार्श्वभूमीवर रविवारी (6 जुलै) रोजी शहरातून कोकणात जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच रविवारी होणाऱ्या ताबूत विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
- वाहतुकीचे वळविण्यात आलेले मार्ग
- वाशी पेट्रोलपंप (हजारे पंप) ते खत कारखाना ओढयापर्यंत सर्व वाहनांना पार्किंगसाठी मनाई करण्यात आली आहे.
- कोल्हापूर कडून राधानगरी मार्गे कोकणाकडे जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी बसेस व अवजड वाहने कळंबा-इस्पुलीं-शेळेवाडी-परिते फाटा-भोगावती मार्गे जातील.
- कोल्हापूर ते राधानगरी मार्गावर सर्व वाहनांना रिंगण सोहळा होवून नंदवाळकडे मार्गस्थ झालेनंतर पायी दिंडी ही नंदवाळ फाटयातून आत जाईपर्यंत कोल्हापूर भोगावती रोड तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहे.
-राधानगरी कडून कोल्हापूरकडे येणारी हलकी चारचाकी वाहने हळदी-कुई-इस्पुलीं मार्गे पुढे मार्गस्थ होतील.
- रंकाळा एसटीस्टँड ते राधानगरी या मार्गावर जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी बसेस कळंबा, इस्पुर्ली मार्गे पुढे मार्गस्थ होतील.
- वाहतुकीकरीता बंद करण्यात आलेले मार्ग
- वाशी नंदवाळ फाटा ते नंदवाळगावी जाणारा मार्ग सर्व वाहनांकरीता नंदवाळ फाटा येथे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे.
- जैताळ फाटा ते नंदवाळ जाणारा मार्ग सर्व वाहनांकरीता जैताळ फाटा प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- भिमाशंकर मंदिर फाटा ते नंदवाळगावी जाणारा मार्ग सर्व वाहनांकरीता प्रवेश बंद करण्यात आला आहे.
- या ठिकाणी पार्किंग व्यवस्था
- खत कारखाना (वाशी नंदवाळा फाटा येथून जाणारे भाविकांचे वाहनांकरीता)
- चोरगे महाविदयालय (जैताळ फाटा येथून जाणारे भाविकांचे वाहनांकरीता)
- गिरगांव फाटा (भिमाशंकर मंदिर फाटा येथील भाविकांचे वाहनांकरीता)
- ताबूत विसर्जनासाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल
- या मार्गावरील वाहतूक बंद
- बिंदू चौक ते शिवाजी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते माळकर चौक ते पान लाईन ते पापाची तिकटी ते गंगावेश ते पंचगंगा घाट या मार्गावर दुचाकी व हलकी चारचाकी वाहनांव्यतिरिक्त अन्य सर्व वाहनांना प्रवेश बंद
- बिंदु चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पापाची तिकटी ते गंगावेश ते आखरी रस्ता मार्गे जाणाऱ्या के.एम.टी व एस.टी. बसेस ना बिंदु चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- रंकाळा स्टॅंड ते गंगावेश ते पापाची तिकटी ते माळकर सिग्नल चौक मार्गे धावणाऱ्या सर्व केएमटी व एस.टी बसेसना या मार्गावर प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- वाहतूक वळविण्यात आलेले मार्ग
- गगनबावडा मार्गे कोल्हापूर शहरात येणाऱ्या सर्व अजवड वाहनांना फुलेवाडी नाका येथे प्रवेश बंद करणेत येत आहे. ही वाहने फुलेवाडी नाका ते फुलेवाडी रिंगरोड ते आपटेनगर ते नवीन वाशी नाका ते कळंबा साई मंदिर ते संभाजीनगर मार्गे मार्गस्थ होतील.
- रत्नागिरी कडून कोल्हापूर शहराकडे येणाऱ्या अवजड वाहनांना वडणगे फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने वडणगे, भुये, शिये मार्गे पुढे मार्गस्थ होतील.
- शिवाजी पुल मार्गे शहरात येणारी एस.टी.व के.एम.टी. बसेस गायकवाड बंगला ते आखरी रस्ता ते गंगावेश मार्गे न जाता शिवाजी पुल ते तोरस्कर चौक ते सी.पी.आर. चौक मार्गे पुढे जातील.
- सी.बी.एस.स्टँड कडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या सर्व एस.टी. बसेस या ताराराणी पुतळा ते धैर्यप्रसाद हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालय ते खानविलकर पेट्रोलपंप ते शिवाजी पुल मार्गे पुढे जातील.
- सी.बी.एस.स्टँड कडून गारगोटी, राधानगरी, गगनबावडयाकडे जाणाऱ्या एस.टी. बसेस या ताराराणी पुतळा ते कोयास्को चौक ते हायवे कॅन्टीन चौक ते सायबर चौक ते रिंगरोड मार्गे पुढे जातील.