पहिल्या दिवशी रिकामीच धावली सह्याद्री एक्सप्रेस! वाढीव तिकीटांसह ऑनलाईन तिकिट बुकींगमधील गोंधळाचा फटका
मिरज प्रतिनिधी
कोल्हापूर-पुणे मार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेली सह्याद्री विशेष एक्सप्रेस रविवारी मध्यरात्रीपासून प्रत्यक्षात प्रवाशांच्या सेवेसाठी ऊळावर आली. मात्र, ही रेल्वे पहिल्या दिवशीच प्रवाशांविना रिकामीच धावली. कोल्हापूरातून सुमारे 350 हून अधिक प्रवाशांना घेऊन आलेली ही रेल्वे मिरज आणि सांगली स्थानकावरच रिकामी झाली. पुढील एकाही स्थानकावऊन या रेल्वेसाठी प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही. स्लीपर बोगीमध्ये आरक्षित तिकिट असलेले काही प्रवाशी वगळता पुण्यापर्यंत काही बोटावर मोजण्याइतक्याच प्रवाशांना घेऊन ही रेल्वे गेली. मध्यरात्री गैरसोयीची वेळ आणि वाढीव तिकिट दर आदी कारणांमुळे प्रवाशांनी अत्यल्प प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
कोरोना कालावधीत बंद झालेल्या सह्याद्री एक्सप्रेसच्या जागी पाच ऑक्टोंबरपासून नव्याने विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या विशेष गाडीला चार जनरल, सात स्लीपर, चार तृतीय एसी आणि एक द्वितीय एसी अशा 16 बोगी जोडण्यात आल्या आहेत. ही गाडी दररोज रात्री साडेअकरा वाजता कोल्हापूर स्थानकावऊन सुटते. रात्री साडेबारा वाजता मिरज जंक्शनवर येते. तिथून पुढे मध्यरात्रीच्या काळातच तिचा पुण्याकडे प्रवास सुरू होतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7.45 वाजता ही गाडी पुणे जंक्शनवर पोहचते.
मध्य रेल्वेकडून सदरची रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला जात असताना प्रवाशी हिताकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार दिवसा ही गाडी सुरू करण्याची गरज होती. तसेच तिचा तिकिट दरही मर्यादीत ठेवण्याची आवश्यकता होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.
पूर्वीच्या सह्याद्री एक्सप्रेसला कोल्हापूर ते मुंबई प्रवासासाठी 370 ऊपये दर होता. तोच दर या विशेष रेल्वेलाही लागू करण्यात आला. तर एसी बोगीमध्ये पूर्वी 504 ऊपयांचे तिकिट होते. मात्र, विशेष रेल्वेसाठी 840 ऊपये तिकीट दर करण्यात आले. मात्र, ही गाडी मुंबईपर्यंत न जाता पुण्यापर्यंत प्रवास करणार असल्याने वाढीव भाडे देऊन प्रवास करण्यास प्रवाशांनी नापसंती दर्शवली. याशिवाय रेल्वेच्या वेळेबाबतही प्रवाशांमधून आधीपासून नाराजी व्यक्त केली जात होती. ही गाडी मध्यरात्री ऐवजी दिवसा चालवावी, अशी मागणी प्रवाशी संघटनांनी केली होती.
मात्र, रेल्वे बोर्डाने प्रवाशी संघटना आणि प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष कऊन रात्रीच्या वेळेतच रेल्वे चालविण्याचा पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. त्याचा फटका रेल्वेला पहिल्या दिवशीच बसला. रविवारी पाच नोव्हेंबरपासून ही विशेष सह्याद्री एक्सप्रेस सुरू झाली. कोल्हापूरातून ती 350 प्रवाशांना जनरल बोगीतून घेऊन आली. मात्र, मिरज आणि सांगली स्थानकावरच बहुतांशी रिकामी झाली. स्लीपर आणि एसी डब्यांमध्ये आरक्षित तिकिट असलेल्या काही बोटावर मोजण्या इतक्याच प्रवाशांनी पुण्यापर्यंतचा प्रवास केला. तर जनरल बोगीतही प्रवाशांची संख्या नगण्य होती. त्यामुळे 16 बोगींची ही विशेष रेल्वे पहिल्या दिवशीच प्रवाशांनाविना रिकामी धावल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. भविष्यातही तिला प्रवाशांचा कितपत प्रतिसाद मिळतो, याबाबत साशंकता आहे. दरम्यान, 31 डिसेंबरपर्यंत प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ही रेल्वे सुरू ठेवायची की नाही, याबाबत रेल्वे बोर्डाकडून निर्णय घेतला जाणार आहे.
ऑनलाईन वेबसाईटचाही घोळ
मध्य रेल्वेच्या ऑनलाईन तिकिट बुकींग संकेतस्थळावर या विशेष रेल्वेबाबत चुकीची माहिती दर्शवली जात आहे. आरक्षित तिकिटांसाठी जागांची उपलब्धी पडताळल्यानंतर एकही जागा उपलब्ध नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक प्रवाशांनी ऑनलाईन तिकिट बुकींग केले नाही. काहींनी प्रत्यक्षात स्थानकावर जावूनच तिकिटे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळ संपल्याचे कारण सांगितले जात असल्याने तात्काळ मधून तिकिटेही मिळाली नाहीत. जनरल बोगीलाही म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. रेल्वेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेल्या एसी आणि स्लीपर बोगीही बहुतांशी प्रमाणात रिकाम्याच होत्या. त्यामुळे भविष्यातही प्रवाशांच्या प्रतिसादाविना ही रेल्वे तोट्यात धावण्याची शक्यता आहे.