For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नागाव येथे शेतामध्ये औषध फवारणी करताना विजेच्या तारेला स्पर्शाने शेतक-याचा जागीच मृत्यू!

08:49 AM Jul 07, 2024 IST | Abhijeet Khandekar
नागाव येथे शेतामध्ये औषध फवारणी करताना विजेच्या तारेला स्पर्शाने शेतक याचा जागीच मृत्यू
Advertisement

पुलाची शिरोली/वार्ताहर

Advertisement

नागाव तालुका हातकणंगले येथील चेअरमन पाणंद परिसरातील शेतामध्ये उसावर औषध फवारणी करत असताना शेतावरून गेलेली तार अंगावर पडल्याने तरूणाचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सुनील बापू शिंदे वय वर्ष ४३, कोल्हापूर येथील रहिवाशी असलेले श्री काटे यांच्या नागाव येथील शेतामध्ये ते वाटेकरी म्हणून काम करतात. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ते शेतामध्ये ऊस पिकावर औषध फवारणी करत असताना अचानक पणे शेतावरून गेलेली तार अंगावर पडलेने विजेचा जोरदार धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच नागावचे पोलीस पाटील बाबासो पाटील यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्दी दिली. त्यानंतर तातडीने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून सी पी आर येथे पाठवण्यात आला.महावितरणचे किरण तरडे हे अधिकारी कर्मचाऱ्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांनी महावितरणच्या कामकाजाविषयी रोष व्यक्त केला. घटना घडल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी घटनास्थळी केली होती. या आकस्मिक घटनेमुळे नागावसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची फिर्याद शरद पाटील यांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.