खासगी सावकाराला पाठीशी घालण्यासाठी विरोधी पक्षनेत्याने पोलीस प्रशासनाला धारेवर धरणे, हि लाजिरवाणी बाब; छत्रपती संभाजीनगर मध्ये येवून अंबादास दानवेना उत्तर देवू : राजेश क्षीरसागर
खासगी सावकारी विरोधात सर्वसामान्य कुटुंबियांना न्याय मिळवून देताना राजकीय बदनामी पोटी आखण्यात आलेल्या षड्यंत्राला विरोधी पक्ष पाठीशी घालत असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले. राजकीय बदनामी करण्यासाठी एका विरोधी पक्षनेत्याला खाजगी सावकाराच्या बाजूने उभे राहून पोलीस प्रशासनाला धारेवर धरावे लागते, हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच घडलेली गोष्ट आहे. म्हणजेच विरोधी पक्षनेते कॉंग्रेस प्रणीत खासगी सावकारीला पाठबळ देत आहेत. असे मत राज्य राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
माध्यम अशी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी अंबादास दानवे यांच्यावर जोरदार टीका केली, ती म्हणाले "विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोल्हापुरात येवून आज गरळ ओकली. एखाद्या लोकप्रतिनिधीचा एकेरी भाषेत उल्लेख करण्यापर्यंत त्यांची मजल गेली यावरून त्यांच्या संस्काराचे दर्शन होते. अंबादास दानवे हे जनतेतून निवडून न येता मागच्या दरवाजाने आमदार होवून विरोधी पक्षनेते बनले आहेत. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नाची जाण नाही. राजकीय हेतूने अंबादास दानवे यांनी केलेल्या स्टंटबाजीस छत्रपती संभाजीनगर मध्ये येवून उत्तर देवू" असे जाहीर आव्हान राजेश क्षीरसागर यांनी अंबादास दानवे यांना दिले आहे.