लोकसभेच्या आधी मोठ्या राजकिय घडामोडी...अनेक बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश; धनंजय महाडिकांचा दावा
लोकसभेच्या आधी मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा धक्कादायक दावा करून भाजपमध्ये इनकमिंग करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील अनेक नेते इच्छुक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
लोकसभेच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील राजकारण तापत असून आपल्या पदरात तिकीट पडण्यासाठी उमेदवारांच्य़ा या पक्षातून त्या पक्षामध्ये उड्या घेत आहेत. महाराष्ट्रात अजून तिकिट वाटप होऊन चित्र स्पष्ट झालं नसलं तरी विविध पक्षांकडून आता आपल्या पक्षामध्ये इनकमिंग असल्याचा दावा होत आहे.
हेही वाचा >>>कोल्हापूरातून भाजप नेत्यांचा मंडलिकांच्या उमेदवारीला विरोध...कुपेकरांची कबुली
कोल्हापूरचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनीही आज माध्यमांशी दावा करताना लोकसभेच्या निवडणुकीपुर्वी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग असल्याचं म्हटलं आहे.ते म्हणाले, "आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहीजण भाजपमध्ये येणार आहेत. तसेच भाजप लोकसभेत 400 पार गेल्यानंतरही अनेकांचा भाजप प्रवेश होणार आहे." असा दावा त्यांनी केला.
संग्रामसिंह कुपेकर यांचे वक्तव्य चुकीचे
चंदगड तालुक्यातील भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी 2019 च्या निवडणुकांमध्ये आम्ही संजय मंडलिकांचा प्रचार केला पण पाच वर्षामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवला नाही. असे म्हणून आम्ही धनंजय महाडिकांविरोधात प्रचार केला ही आमची मोठी चुक झाल्याचं विधान केलं. यावर बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, "राज्यात महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र काम करत आहेत. संग्रामसिंह कुपेकर यांनी केलेलं वक्तव्य चुकिचे असून भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी अशी वक्तव्य करू नयेत. अशी वक्तव्य करताना पदाधिकाऱ्यांनी विचार करावा."अशा सुचनाही त्यांनी दिल्या.