कोल्हापूर पोलिसांची गांजा कारवाईचा सपाटा
३५ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त तर
१०७ आरोपी गजाआड
कोल्हापूर
जिल्ह्यामध्ये कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. यामध्ये सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत सुमारे १२४ किलो गांजा जप्त केला आहे. तर ७७ केसेस दाखल केल्या आहेत. तसेच अमली पदार्थ्यांचे सेवन करणारे ५७ तर अमली पदार्थ बाळगण्यांसंबंधी २६ केसेस केल्या आहेत.
सुमारे ३५ लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये अमली एमडी ड्रग्स सुमारे अडीचशे ग्रॅम असून एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. असे सुमारे १०८ आरोपी गजाआड गेले आहेत. ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शकांनी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दिली. कोल्हापूर जिल्हा अमली पदार्थ व गांजा मुक्त होणार का? असा प्रश्न सर्व स्थरातून विचारला जात आहे.
पुढे पोलिस निरीक्षक कळमकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण वर्ग सध्याच्या काळात गांजासह इतर अमली पदार्थांकडे आकर्षक झालेला आहे. याबद्दलच्या अनेक तक्रारी पोलिस नियंत्रण कक्ष आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांना प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने गांजा व इतर अमली पदार्थ यांच्याविरुद्ध विशेष मोहीम १ जानेवारी २०२५ पासून जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात येणारे अमली पदार्थ हे कर्नाटक व इतर परराज्यातून येत आहेत. या पुढे ज्या व्यक्तींकडे गांजा सापडेल किंवा गांजा विक्री करतील यांच्यावर अधिनिमयांतर्गत मालमत्ता जप्त करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी दिले आहे.काही अल्पवयीन ही गांजाचे सेवन करताना आढळून आलेले आहेत. त्यांना बालसुधार गृहात पाठवून त्यांचे समुपदेशन केले जात आहे. तर गांजा विक्री करणारे हे २० ते २५ वयोगटातील किंवा त्यातूनही मोठे आहेत. विक्री करणाऱ्यामध्ये एकही अल्पवयीन नाही. गांजा विक्री करणाऱ्यांमध्ये बहुतांश अटकेत आहेत, अशीही माहिती पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दिली.