पी. एन. पाटलांच्या आठवणीेेेने सतेज पाटील भावनावश!कुटुंबियांची भेट घेताना आश्रू अनावर
आपल्या परदेश दौ-यामुळे काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील यांच्या अंतिमयात्रेत सहभागी होता न आल्याने आमदार सतेज पाटील यांनी आज दिवंगत पी.एन. पाटलांच्या मूळ गावी सडोली खालसा येथे जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांना यांचे भेट घेताना सतेज पाटील भावुक झालेच दिसून आलं.
जिल्ह्यातल्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे काल निधन झाले. आकस्मित घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला. गेल्या चार दिवसापासून खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेले पी. एन. पाटील यांना वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्यात आले. पण त्याला यश आले नाही.
दरम्यान, काल त्यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील अनेक सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अंतिम यात्रेत सहभागी होऊन त्यांना आदरांजली वाहिली. पण गेल्या आठवड्यापासून परदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील पी. एन पाटलांच्या अंतिम यात्रेत सहभागी होऊ शकले नाहीत.
आज सकाळी आमदार सतेज पाटील कोल्हापुरात दाखल झाले. पी. एन. पाटील यांच्या निधनाची बातमी कळताच आपला परदेश दौरा निम्म्यातच टाकून ते तातडीने कोल्हापूरला रवाना झाले होते. पण काही तांत्रिक कारणामुळे त्यांना अंतिमयात्रेत सहभागी होता आले नाही.
आज सकाळी कोल्हापुरात दाखल होताच आमदार सतेज पाटील थेट पी.एन. पाटील यांच्या घरी गेले. दिवंगत पीएन पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. पीएन पाटलांचे चिरंजीव राहुल यांना आलिंगन देताना आमदार सतेज पाटील भावुक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी आपल्या आश्रुंना वाट करून दिली.
यानंतर माध्यमांशी बोलताना सतेज पाटील यांनी पी.एन.पाटील यांच्या जाण्याने काँग्रेसची कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे असं म्हटलं आहे. तसेच काँग्रेस अडचणीत असताना पी एन पाटील यांनी ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना सांभाळलं ते खरोखर मार्गदर्शक ठरणार आहेत असेही ते म्हणाले.