पी. एन. पाटील यांची प्रकृती गंभीर पण स्थिर; आधारचे एम.डी. डॉ. उल्हास दामले यांची माहिती
अधुनिक जीव रक्षक यंत्रणांवरती उपचार सुरु; विविध क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्त्यांची हॉस्पिटलच्या आवारात गर्दी
कोल्हापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील रविवारी निवासस्थानी बाथरूममध्ये तोल जाऊन पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने अॅस्टर आधार रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर मुंबई व कोल्हापूर येथील विशेष वैद्यकीय पथकाने त्वरित शस्त्रक्रिया केली. सोमवारी दिवसभर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प - कृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचे अॅस्टर आधारचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. उल्हास दामले यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रचारात आमदार पी. एन. पाटील आघाडीवर होते. करवीर विधानसभा मतदारसंघाबरोबरच त्यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. या प - चारादरम्यानच त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास सुरू असल्यामुळे त्यांना थकवा जाणवत होता. यामुळे ते काही दिवस घरी थांबले होते. दरम्यानच्या कालावधीत काही चाचण्या करून ते घरीच उपचार घेत होते. पण रविवारी सकाळी बाथरूममध्ये चक्कर येऊन ते कोसळले, त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर मार लागल्यामुळे तातडीने त्यांना अॅस्टर आवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोल्हापूर व मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांनी आमदार पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया केली असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहेत.
हॉस्पिटलच्या आवारात गर्दी कायम
आमदार पी. एन. पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी दुसऱ्या दिवशीही रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. आमदार पाटील यांची प्रकृती कशी याहे ? याची विचारणा कार्यकर्त्यांकडून केली जात होती. सोमवारी दिवसभरात श्रीमंत शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, माजी खासदार संभाजीराजे छात्रपती, 'गोकुळ'चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, निमाणीचे माजी आमदार काका पाटील, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन आमदार पाटील यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, श्रीपतराव बोंद्रे बँकेचे चेअरमन राजेश पाटील यांची भेट घेऊन पी. एन. पाटील यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.
कृत्रिम श्वासोच्छवास व आधुनिक जीव रक्षण यंत्रणांवरती उपचार सुरु
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे. त्यांच्या मेंदूतील रक्तस्त्रावासाठी रविवारी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना अतिदक्षता विभागामध्ये कृत्रिम श्वासोच्छवास व आधुनिक जीव रक्षण यंत्रणांवरती उपचार चालू आहेत. सोमवारी दिवसभरात केलेल्या विविध तपासण्यामधून रक्त गोठण्याची प्रक्रिया ही सध्या योग्य बदल दाखवत आहे. मेंदूतील रक्तस्त्राव व त्यानंतर येणारी मेंदूची सूज या सर्व गोष्टी लक्षात घेता, यामधील सुधारणांसाठी आता काळजी वाटते. सध्या अतिदक्षता विभागामध्ये कृत्रिम श्वासोच्छ्वास व आधुनिक जीव रक्षण सुविधा यांच्या
डॉ. उल्हास दामले, मॅनेजिंग डायरेक्टर, अॅस्टर आधार
अफवांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
सोमवारी दिवसभरात आमदार पी.एन. पाटील यांच्या प्रकृतीबाबत समाजमाध्यमांवरून अनेक चुकीच्या पोस्ट व्हायरल झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. अखेर आमदार पाटील यांचे चिरंजीव राहूल पाटील यांनी प -कृती स्थिर असल्याचे जाहीर केल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. आमदार पाटील यांच्या प्रकृतीमध्ये त्वरीत सुधारणा व्हावी यासाठी भावूक झालेल्या कार्यकर्त्यांनी देवाकडे केलेली प्रार्थना समाजमाध्यमांवरून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.
आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील डॉक्टरांच्या संपर्कात
घरगुती कार्यक्रमानिमित्त आमदार सतेज पाटील अमेरिकेला गेले आहेत. पण आमदार पी.एन. पाटील यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून ते सतत राजेश पाटील आणि राहूल पाटील यांच्या संपर्कात आहेत. हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी त्यांचे नियमित बोलणे सुरू आहे. आमदार ऋतुराज पाटील हे पी. एन. पाटील यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी पोहोचले होते. त्यांनी प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. सुहास बराले यांना मुंबईतून कोल्हापूर आणण्यासाठी खास विमानाची व्यवस्था केली. त्यानंतर ते राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्या सतत संपर्कात आहेत. सोमवारी हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांनी पाटील बंधू आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. अतिदक्षता विभागात जाऊन त्यांनी आमदार पाटील यांच्या प्रकृतीची पाहणी करून डॉक्टरांकडून माहिती घेतली. यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शारंगधर देशमुख, मधुकर रामाणे, माँटी मगदूम, अशपाक आजरेकर, प्राचार्य डॉ. महादेव नरके सोबत होते.