कोल्हापूर, फलटण, मुंबई संघाची विजयी सलामी
इस्लामपूर :
निशिकांतदादा स्पोटर्स फौंडेशनच्या वतीने सुरु झालेल्या निशिकांतदादा सुवर्ण चषक भव्य राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत यजमान निशिकांतदादा फौंडेशन सह कोल्हापूर, फलटण, मुंबई पोर्ट संघांनी विजयी सलामी दिली. सोमवारी आ.सदाभाऊ खोत यांच्या हस्ते व निशिकांत भोसले-पाटील यांच्या उपस्थितीत स्पर्धेला प्रारंभ झाला. पहिला सामना महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर व यंग स्टार स्पोर्ट्स क्लब सोलापूर दरम्यान झाला. कोल्हापूर संघाने हा सामना 8-0 फरकाने जिंकला. सामनावीर पृथ्वीराज साळोखे ठरला. सातारा जिल्हा हॉकी असो. फलटण संघाने एस. आर. पी.एफ पुणे संघास 2-1 गोलनी नमवले. यश खुरांगे याला सामनावीरचा मान मिळाला. मुंबई पोर्ट ने मुंबई पोलीस संघाचा 4-2 गोल फरकाने पराभव केला. यजमान निशिकांतदादा फौंडेशनने वडगाव हॉकी अपॅडमी संघास 1-0 गोलनी हरवले. वडगावचा श्रेयस उमाजी सामनावीर ठरला. खालसा युथ क्लब नांदेड व यंग स्टार सोलापूर दरम्यानचा सामना बरोबरीत सुटला. फलटण संघाने निशिकांतदादा फौंडेशन बी संघाचा 3-0 गोलनी पराभव केला.
उद्घाटन प्रसंगी गौरव नायकवडी, माजी नगरसेवक वैभव पवार, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील उपस्थित होते. स्वागत ा†ना†शकांतदादा स्पोटर्स फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आ†जत पाटील यांनी केले. अशोकराव खोत, भास्कर मोरे, प्रांजली अर्बन ा†नधी बॅकेचे अध्यक्ष अक्षय पाटील, कृषी उत्पˆ बाजार सा†मतीचे संचालक संजय लाखे, अमोल पाटील, उमेश जाधव, हॉकी असा†शएशनचे प्रा.डॉ.जे.एस.पाटील, सयाजी जाधव, उत्तम पवार, मोहन जाधव, ा†ना†शकांतदादा स्पोटर्स फौंडेशनचे प्रा†शक्षक अशोक जाधव, बाजीराव भोसले, संतोष पाटील, दत्तात्रय पाटील, संदीप थोरात, रविंद्र खरात, शशीकांत सुहाशे, अर्जुन जाधव, तानाजी सुतार, अर्थव कांबळे, कुणाल पाटील व मान्यवर उपस्थित होते.