परिते गावात महाप्रसादातून विषबाधा! १०० जणांवर उपचार सुरु
भोगावती/प्रतिनिधी
परिते ता.करवीर येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदीरामध्ये चालू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या प्रसादातून बुधवारी विषबाधा झाल्याने सुमारे १०० हून अधिक लोकांना उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना राशिवडे बु,इस्पुर्ली व ठिकपुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे.
परिते गावामध्ये हरिनाम सप्ताह सुरु आहे,काल दुपारी प्रसाद घेतल्यानंतर संध्याकाळी जुलाब,उलटी,संडासचा त्रास होऊ लागला. हळुहळू रुग्णांची संख्या वाढत गेली.आतापर्यत शंभरहून अधिक जणांना प्रसादातून विषबाधा झाल्याचे आढळून आले आहे. संबधितांवर राशिवडे, ठिकपुर्ली, इस्पुर्ली, सी.पी.आरमध्ये उपचार सुरु आहेत. गोड पदार्थातूनच विषबाधा झाल्याची शक्यता कसुन इस्पुर्ली आरोग्य केंद्रातील कर्मचारी गावात दाखल झाले आहेत.घरनिहास तपासणी केली जात आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आली आहे. त्यांच्यावर राशिवडे, ठिकपुर्ली, ईस्पुर्ली तसेच कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णांलयात उपचार सुरू आहेत.
करवीर तालुक्यातील परिते येथे विठठल रुक्मिणी मंदीरात पारायणास बसलेल्या वाचकांना व भाविकांना अन्नदान करण्याची या सप्ताहात परंपरा आहे. पहिल्याच दिवशी संजय मारुती पाटील यांनी १५० भाविकांना अन्नदान केले. यामध्ये भात आमटी,भाजी,बासुंदी अशा पदार्थांचा समावेश होता. भोजन केलेल्या १५० पैकी ६० जणांना २४ तासानंतर मंगळवारपासून संडास, उलट्या, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे दिसू लागली. यापैकीं ३० रुग्णांना ईस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात, १३ रुग्णांना राशिवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात, ७रुग्णांना ठिकपुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर एका रुग्णास कोल्हापूर येथील सी.पी.आर.रुग्णांलयात दाखल करण्यात आले आहे. दुग्धजन्य पदार्थातुन विषबाधा झाल्याची शक्यता असुन रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. घर ते घर तपासणी सुरु आहे. तर बांधीतांवर उपचार सुरु असुन रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रणजित पाटील .....(समुह आरोग्य अधिकारी परिते उपकेंद्र)